वेस्ट इंडिजवर मात करत भारताने २०१९ विश्वचषक स्पर्धेत आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. मोहम्मद शमीने गोलंदाजीमध्ये आपली कामगिरी चोख बजावत ४ फलंदाजांना माघारी धाडलं. विंडीजचे खेळाडू मैदानात आपल्या अनोख्या सेलिब्रेशनसाठीही ओळखले जातात. सध्या विंडीजच्या शेल्डन कॉट्रेलचं विकेट घेतल्यानंतरच सॅल्युट सेलिब्रेशन चांगलच गाजतं आहे.

भारताविरुद्ध सामन्यात कॉट्रेल बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने कॉट्रेलच्या या सेलिब्रेशन स्टाईलची नक्कल करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता शेल्डन कॉट्रेल हे सॅल्युट सेलिब्रेशन आपल्या देशातील पोलिस आणि लष्कराला अभिवादन करण्यासाठी करतो. मात्र शमी आणि भारतीय खेळाडूंनी या प्रकाराची उडवलेल्या खिल्लीमुळे अनेक जण नाराज झाले होते. कॉट्रेलने मात्र शमीच्या या डिवचण्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. कॉट्रेल हा स्वतः लष्कराचा जवान आहे.

दरम्यान भारताविरुद्ध सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर विंडीजचं या स्पर्धेतलं आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे. एका विजयासह विंडीजचा संघ ३ गुणांनीशी आठव्या स्थानावर आहे. साखळी फेरीत विंडीजचे केवळ २ सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या सामन्यांमध्ये विंडीजचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader