India vs Australia World Cup Final 2023: आयुष्यात अशी अनेक वळणे येतात जेव्हा तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतात, मोठे मन दाखवावे लागते. हा निर्णय त्यावेळी अवघड वाटू शकतो पण भविष्यात तुमचे आयुष्य बदलू शकते. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सबाबत घडला आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजी कमिन्सने एक कठीण निर्णय घेतला. त्याला ३७० दिवसांनी त्याचा लाभ मिळाला. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०२३चा विश्वचषक जिंकला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमिन्सने आयपीएल सोडले होते

पॅट कमिन्स आयपीएल २०२२मध्ये केकेआरचा भाग होता. फलंदाजी आणि गोलंदाजीत त्याने अप्रतिम कामगिरी केली. पण १५ नोव्हेंबर २०२२ रोजी कमिन्सने ट्वीट केले की, “तो आयपीएल २०२३मध्ये खेळणार नाही.” कमिन्सला आयपीएलच्या एक हंगाम खेळण्यासाठी ७.२५ कोटी रुपये मिळतात. कमिन्सने लिहिले होते की, ‘पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये मी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा करार सोडण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. माझे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पुढील १२ महिन्यांसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनी भरलेले आहे, त्यामुळे अ‍ॅशेस मालिका आणि विश्वचषकापूर्वी थोडी विश्रांती घेतली जाईल.”

आयपीएल नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनला

आयपीएलनंतर लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेतेपदाचा सामना खेळला गेला. यामध्येही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा होती. लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेला तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तिथेही कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. यानंतर अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये जाऊन २-२ अशी बरोबरी साधून ट्रॉफी परत केली.

आता विश्वचषक विजेतेपद

ऑस्ट्रेलियाने आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली विश्वचषक २०२३चे विजेतेपद पटकावले आहे. कमिन्सने फलंदाजी आणि चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन आणि उपांत्य फेरीत भारताविरुद्ध दोन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने अवघ्या १४ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या कठीण परिस्थितीत ६८ चेंडू खेळून त्याने ग्लेन मॅक्सवेलला साथ दिली होती. तो खेळपट्टीवर एक बाजू लावून उभा होता. उपांत्य फेरीतही त्याने नाबाद १४ धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.

हेही वाचा: IND vs AUS Final: टीम इंडियाच्या पराभवानंतर कपिल देव यांनी रोहित शर्माचे कौतुक केले; म्हणाले, “अजून पुढे खूप यश प्रतीक्षेत…”

टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्व गट सामने जिंकले आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. याच संघाने या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या गट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, मात्र अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 370 days ago pat cummins took a difficult decision left rs 7 25 crore and made the team world champion avw