Afghanistan Team WC 2023: विराट कोहली हा टीम इंडियाचा असा स्टार फलंदाज आहे जो केवळ फलंदाजीसाठीच नाही तर त्याच्या आक्रमक स्वभावामुळेही प्रसिद्ध आहे. आयपीएल २०२३मध्ये विराट कोहलीबाबत सर्वात मोठा गदारोळ निर्माण झाला होता, जेव्हा तो अफगाणिस्तानचा अष्टपैलू नवीन उल हकशी भिडला होता. सामन्यातील हायव्होल्टेज संघर्षानंतर दोन्ही खेळाडूंनी सोशल मीडियावरही एकमेकांवर निशाणा साधला. तेव्हापासून या दोघांमध्ये अजिबात विस्तवही विझत नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू आमनेसामने येणार आहेत. ते समोरासमोर आल्यावर काय होईल? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आगामी विश्वचषकात विराट वि. नवीन असा २.० सामना पाहायला मिळू शकतो.

अफगाणिस्तानने विश्वचषकासाठी आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामुळे नवीन-उल-हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, विश्वचषकात विराट आणि नवीन-उल-हक कधी आमनेसामने येणार, याची चाहत्यांना प्रतीक्षा लागली आहे. नवीनला अफगाणिस्तान बोर्डाने आशिया कपमध्ये संधी दिली नाही. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन करणे कठीण होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, अफगाणिस्तान क्रिकेटने विश्वचषकात नवीनची निवड करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Rashtrasant Tukdoji Maharaj advised against spending on marriage promoting avoiding loans through village songs
नोंदणी विवाहाकडे नव्या पिढीचा कल, रशियन युवक म्हणतो हेच बरं.
Mohanji Bhagwat expressed his concern about the decline in the country population
चारा नाही; तर चोचही नकोच!
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?

अफगाणिस्तानचा संघ ७ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध दोन हात करणार आहे. यानंतर ११ ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर यजमान टीम इंडियाशी भिडणार आहे. या सामन्याबद्दल सर्व क्रिकेट चाहते उत्सुक आहेत कारण, पुन्हा एकदा कोहली विरुद्ध नवीन उल हक मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आयपीएलमध्ये दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. लखनऊकडून खेळणाऱ्या नवीनची एका सामन्यादरम्यान विराट कोहलीसोबत भांडण झाले होते.

हेही वाचा: Joe Root: “रोहित-विराटला संघातून वगळणे…” वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या जो रुटचे टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंबाबत मोठे विधान

काय होतं संपूर्ण प्रकरण?

आयपीएल २०२३ दरम्यान, विराट कोहली आणि नवीन उल हक मैदानापासून हस्तांदोलनापर्यंत खूप चर्चेत होते. हस्तांदोलन करताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीरनेही या भांडणात उडी घेतली होती. त्यामुळे विराट आणि गंभीर यांच्यात देखील बराच काळ वाद सुरु होता. आता विश्वचषकात विराट आणि नवीन उल हक एकमेकांना कसे सामोरे जातात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

अफगाणिस्तानच्या विश्वचषक संघात राशिद खान, मोहम्मद नबी या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे, जे सध्या या संघाचे मुख्य खेळाडू मानले जातात. या दोघांसह या संघात अनेक खेळाडू आहेत जे आयपीएल खेळतात आणि त्यांना येथील खेळपट्ट्यांची चांगली माहिती आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! नसीम शाह आशिया कपमधून बाहेर, हारिस रौफबाबत सस्पेन्स कायम

विश्वचषक २०२३साठी अफगाणिस्तानचा १५ सदस्यीय संघ

इब्राहिम झद्रान, रहमुल्ला गुरबाज, रहमत शाह, रियाझ हसन, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अली खिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, अब्दुल रहमान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारूक, नवीन उल हक.

Story img Loader