Rishabh Pant on World Cup 2023: आयसीसी या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित करणार आहे. त्याआधी टीम इंडिया आशिया चषकासाठी आपली तयारी मजबूत करेल. या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये अजून बराच वेळ आहे, पण त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत खेळणे कठीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार अपघातात जखमी झालेला पंत या दोन मोठ्या टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे.

अहवालानुसार, ऋषभ पंतच्या पुनरागमनासाठी थोडा वेळ लागेल आणि जर तो लवकर बरा झाला तर पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत तो पुन्हा मैदानात उतरू शकतो. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी घरी जात असताना उत्तराखंडमधील रुरकी येथे पंतचा कार अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा जीव थोडक्यात बचावला. पंतच्या शरीराच्या अनेक भागांना दुखापत झाली होती. आता त्याच्या दुखापतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Konkan Railway passengers face inconvenience during traveling no proposal for doubling route confirms authority
कोकण रेल्वेवरील दुहेरीकरणाचा तूर्तास प्रस्ताव नाही
gulabrao deokar loksatta news
शरद पवार यांचे निष्ठावंत गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेश करणार, सोमवारी भेट

हेही वाचा: IPL 2023 Playoff Scenario: आयपीएलची चुरस वाढली! ७ सामने पूर्ण, ७ बाकी, १० संघांसाठी कसा आहे प्लेऑफचा रस्ता?

मदतीशिवाय चालण्यासाठी खूप मदत घ्यावी लागू शकते

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल सामन्यादरम्यान पंत स्टँडचा आधार घेऊन चालत होता. बंगळुरूमध्ये संघाच्या सराव सत्रादरम्यानही तो दिसला होता. पंतला कोणत्याही मदतीशिवाय चालायला काही आठवडे लागू शकतात. असे दिसते आहे की पंत वेगाने बरा होत आहे परंतु मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी त्याला अजून अवधी आहे. पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान त्याला सात ते आठ महिने लागू शकतात.

यष्टिरक्षणसाठी सज्ज होण्यास अजून वेळ लागेल

जरी पंत क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला तरी त्याला यष्टिरक्षणासाठी तयार होण्यास बराच वेळ लागू शकतो. तो फलंदाज म्हणून प्रथम पुनरागमन करू शकतो. पंत मैदानात परतण्याचे धाडस दाखवत असल्याचे मानले जात आहे. बीसीसीआयही त्याला सर्वतोपरी मदत करत आहे. ऋषभवर जानेवारीमध्ये लिगामेंट टीयरची शस्त्रक्रिया झाली होती.

हेही वाचा: WTC Final: टीम इंडियाच्या निवडीवर हर्षा भोगलेंनी केले प्रश्नचिन्ह उपस्थित! नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या

पंतवर आणखी एक शस्त्रक्रिया होऊ शकते

ऋषभ पंत हा मुंबईत उपचार घेत होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मधील मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसिनचे प्रमुख आर्थ्रोस्कोपी आणि शोल्डर सर्व्हिसचे संचालक डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. पंतने शेवटचे डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरावासाठी जाईल त्याचवेळी त्याची फिटनेस कशी आहे यावरून तो संघात पुनरागमन करणार का? आणि करणार असेल तर त्याच्या परतीची नेमकी वेळ कोणती? याची माहिती मिळू शकेल.

Story img Loader