कोलकाता : ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम असलेल्या संघाचा सामना करण्यास सज्ज असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणाला. भारताने आतापर्यंत स्पर्धेत सर्व दहा सामने जिंकत अंतिम फेरीत स्थान मिळवले. तर, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला तीन गडी राखून नमवत अंतिम सामन्यातील आपले स्थान निश्चित केले.

हेही वाचा >>> विश्वचषक भारतच जिंकणार! माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विश्वास

Indian Women On Course For Clean Sweep Against West Indies
भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Image of protesters at the MCG
Boxing Day Test : बॉक्सिंग डे कसोटीत खलिस्तान्यांचा राडा, भारतीय प्रेक्षकांनी दिले जशास तसे उत्तर
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय

 ‘‘आम्हाला सर्वोत्तम संघाचा सामना करायचा आहे. भारत हा स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे. ही विश्वचषक स्पर्धा असून जेतेपद मिळवण्यासाठीच आम्ही खेळत आहोत. आमचा सामना अशा संघाशी आहे, ज्यांनी आतापर्यंत सर्व आव्हानांना सामोरे जात आपली अपराजित लय कायम राखली आहे,’’ असे स्टार्क म्हणाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील साखळी फेरीतील पहिला सामना खेळला गेला होता. मात्र, हा सामना एकतर्फी राहिला. चेन्नईत झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात केली. ‘‘आम्ही विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताचा सामना केला होता आणि अंतिम सामन्यात आम्ही एकमेकांविरुद्ध खेळू. त्यामुळे कोणता संघ वरचढ ठरेल हे त्या दिवशीच कळेल,’’ असे स्टार्कने सांगितले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फिरकीपटूंचा सामना करताना अडचणी आल्या. ऑस्ट्रेलियन संघ अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंबाबत चिंतित आहे, या प्रश्नावर स्टार्क म्हणाला,‘‘ आम्ही अहमदाबादला पोहोचल्यानंतर सामना नवीन किंवा जुन्या खेळपट्टीवर खेळवला जाणार हे कळेल.’’

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २००३ मध्ये विश्वचषक अंतिम सामना झाला होता आणि तेव्हा स्टार्क १३ वर्षांचा होता,‘‘मला इतकेच माहीत आहे  की, हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकला होता. याशिवाय मला सामन्यात काय झाले हे माहीत नाही,’’ असे स्टार्कने सांगितले. दोन्ही संघांना एकमेकांच्या मजबूत व कमकुवत बाजू माहीत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ नरेंद्र मोदी स्टेडियमच्या १ लाख ३० हजार चाहत्यांसमोर भारताचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. स्टार्क म्हणाला,‘‘ हा विश्वचषकाचा अंतिम सामना आहे. दोन्ही संघांतील खेळाडू वेगवेगळय़ा प्रारू पात तेथे खेळलेले आहेत. दोन्ही संघ या वर्षांच्या सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघांना मोठे सामने खेळण्याचा चांगला अनुभव आहे.’’

चोकर्सम्हणणे अयोग्य -वॉल्टर

ऑस्ट्रेलियन संघाला आमच्या संघाने अखेपर्यंत झुंज दिली. त्यामुळे यावेळी आम्ही ‘चोकर्स’प्रमाणे खेळलो असे म्हणताच येणार नाही, असे वक्तव्य दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी केले. उपांत्य सामन्यात एकवेळ ४ बाद २४ अशी स्थिती असतानाही आफ्रिकेने २१२ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही प्रभावी मारा केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी ४७.२ षटकांपर्यंत झगडावे लागले. ‘‘तुम्ही जेव्हा जिंकण्याच्या स्थितीतून सामना गमावता, त्याला ‘चोक’ असे म्हणतात. मात्र, आम्ही सुरुवातीपासून पिछाडीवर होतो. आम्ही हार न मानता सामन्यात पुनरागमन केले आणि अखेपर्यंत लढा दिला. आम्ही चांगली धावसंख्या उभारली, ज्यामुळे आम्हाला झुंज देता आली. त्यामुळे आम्हाला ‘चोकर्स’ म्हणताच येणार नाही,’’ असे वॉल्टर यांनी नमूद केले.

आम्ही एक दिवस नक्की विश्वचषक जिंकू -मिलर

कोलकाता : दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवस नक्की विश्वचषक जिंकेल, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर म्हणाला. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी चुरशीच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर तीन गडी राखून विजय नोंदवला. ‘‘संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे. आम्ही अनेक स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि वेगवेगळय़ा संघांचा सामना केला आहे. या वेळी आम्हाला विजेतेपद मिळवता आले नसले, तरीही आमचा संघ एक दिवस नक्कीच विश्वचषक जिंकेल. आम्ही काय करू शकतो हे सर्वाना दाखवून दिले आहे,’’ असे सामना संपल्यानंतर मिलरने सांगितले.

Story img Loader