IND vs AUS Final : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आसीसी ) एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ रविवारी ( १९ नोव्हेंबर ) आमने-सामने असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमर हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी विविध विषयांवर रोहित शर्मानं भाष्य केलं आहे.

रोहित शर्मा म्हणाला, “हा माझ्यासाठी सर्वांत मोठा क्षण आहे. आम्ही अद्याप प्लेईंग ११ बाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. १५ मधील कुठलेही खेळाडू खेळू शकतात. प्रतिस्पर्धी संघाची ताकद पाहून निर्णय घेऊ.”

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा : फायनल सामना बरोबरीत राहिल्यानंतर कसा निवडला जाणार विजेता? जाणून घ्या आयसीसीचे नवीन नियम

“पहिल्या काही सामन्यांमध्ये मोहम्मद शमी खेळू शकला नाही. तो शमीसाठी खूप कठीण प्रसंग होता. मात्र, शमीने सिराज आणि अन्य गोलंदाजांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. शमीनं गोलंदाजीसाठी खूप मेहनत घेतली,” असं कौतुक रोहित शर्मानं केलं आहे.

“संघात राहुल द्रविड यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. राहुल द्रविड खेळाडूंना पूर्ण पाठिंबा आणि स्वातंत्र्य देतात. भारतीय क्रिकेटसाठी राहुल द्रविड यांनी मोठं काम केलं आहे. आणि आता द्रविड या मोठ्या क्षणाचा भाग बनू इच्छित आहेत,” असं रोहित शर्मानं सांगितलं.

हेही वाचा : विजयासाठी किती धावा ठरणार पुरेशा? आकडा आला समोर; पीच क्युरेटरनं व्यक्त केला अंदाज!

“विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पहिल्या ४ ते ५ सामन्यांमध्ये आम्ही लक्ष्याचा पाठलाग केला. बुमराह, शामी, सिराज यांनीही चांगली गोलंदाजी केली आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनीही विकेट्स घेतल्या,” असं रोहित शर्मानं म्हटलं.

“बाहेरील वातावरण, अपेक्षा आणि दबाव आम्हाला माहीत आहे. पण, ड्रेसिंग रूममधील वातावरण शांत राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. खेळाडूंना काय वाटतं माहीत नाही. पण, संघाची बैठक आणि प्रशिक्षणावेळी प्रत्येक खेळाडू शांत असतो. भारतीय खेळाडू असल्याने तुम्हाला दडपणांना सामोरे जावे लागतेच,” असं रोहित शर्मा म्हणाला.