Team India, World Cup 2023: भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सलग पाच सामने जिंकले जिंकत जवळपास उपांत्य फेरीची तिकीट बुक केले आहे. सध्या गुणतालिकेत भारत अव्वल आहे आणि एकमेव भारतीय संघ असा आहे जो या स्पर्धेत अजिंक्य आहे. नुकतेच पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने न्यूझीलंडला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाबाबत वक्तव्य केले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ९५ धावांची मोठी खेळी खेळली, ज्यामुळे भारताने २७४ धावांचे मोठे लक्ष्य गाठले आणि विजयाची नोंद केली. मात्र, अखेरीस त्याला शतक पूर्ण करता आले नाही. विराटबद्दल शोएब अख्तर म्हणाला, “तो एक असा व्यक्ती आहे जो दबावातही उत्तम खेळ करतो. दबाव हा त्याच्यासाठी एक संधी असते. ती संधी म्हणजे शतक ठोकणे, विजयी खेळी खेळणे आणि इन्स्टाग्रामवर अधिक फॉलोअर्स वाढवणे. हे सगळं तो करू शकतोस कारण तो त्यास पात्र आहे.”

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य

शोएबने भारतीय संघाच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, “शुबमन गिल हा न्यूझीलंड संघासाठी एकटा पुरेसा आहे. जर रोहित शर्मा खराब फटका मारून बाद झाला नसता तर त्यानेच संघाला जिंकवून दिले असते. जर के.एल. राहुल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळायला आला तर विरोधी संघाला तो एकटाच भारी पडू शकतो. भारताला हरवणे हे एवढे सोपे नाही कारण त्यांची फलंदाजी खूप मोठी आहे.” तो पुढे म्हणाला, “कोहलीने आज काय केले हे सर्वांना माहीत आहे, पण राहुलनेही त्याचा भार उचलला आहे. जर तो बाद झाला नसता तर सूर्यकुमारनेही तेच केले असते. याशिवाय शोएबने मोहम्मद शमीचेही कौतुक केले.”

हेही वाचा: PAK vs AFG: पाकिस्तानच्या खराब कामगिरीवर मिकी आर्थरची संतापजनक रिअ‍ॅक्शन, चाहत्यांनी केलं सोशल मीडियावर ट्रोल

रावळपिंडी अशी ओळख असणारा शोएब अख्तर पुढे म्हणाला, “न्यूझीलंडला ३००-३५० धावा करू दिल्या नाहीत यात मोहम्मद शमीची मोठी भूमिका खूप मोलाची होती. तो थोडा महागडा ठरला, पण ते ठीक आहे कारण त्याने पाच फलंदाजांना बाद केले.” तो असेही म्हणाला की, “भारताला त्याच गोलंदाजी कॉम्बिनेशनवर टिकून राहण्याची गरज आहे. त्यांच्याकडे समतोल फलंदाजी आणि गोलंदाजी कॉम्बिनेशन आहे. भारत विश्वचषक जिंकणार नाही असा कोणताही मार्ग नाही.”

काय घडलं सामन्यामध्ये?

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्व १० गडी गमावून २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक १३० धावा केल्या. रचिन रवींद्रने ७५ आणि ग्लेन फिलिप्सने २३ धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (१७ धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा: SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केले अनेक विक्रम, क्विंटन डी कॉक आणि क्लासेनची तुफानी खेळी

भारताकडून विराट कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.