PAK vs ENG, World Cup 2023: या विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही. ते स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानचा संघ शनिवारी (११ नोव्हेंबर) कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टीकाकारांना फटकारले. तो म्हणाला की, “टीव्हीवर बसून मत मांडणे सर्वांना सोपे जाते, प्रत्यक्षात खेळणे मात्र खूप कठीण असते.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोईन खान आणि शोएब मलिकसह माजी कर्णधारांनी बाबरच्या कर्णधारपदावर उघडपणे टीका केली आहे. कर्णधारपदाच्या दबावाचा बाबर आझमच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचे या माजी कर्णधारांचे मत आहे. टीकेचा संदर्भ देत बाबर म्हणाले, “टीव्हीवर मते देणे खूप सोपे आहे. जर कोणाला सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी मला थेट फोन करावा, त्यांचे स्वागत आहे, माझा नंबर सर्वांना माहीत आहे.”

हेही वाचा: Babar Azam: विश्वचषकादरम्यान मोठी बातमी! पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मायदेशात परतताच सोडणार कर्णधारपद?

काय म्हणाला शोएब मलिक आणि मोईन खान?

शोएब मलिक म्हणाला होता की, “बाबर एक फलंदाज म्हणून चांगला खेळाडू आहे, पण कर्णधार म्हणून नाही.” दुसरीकडे मोईन खान म्हणाला की, “त्याचवेळी, कर्णधारपद सोडल्यानंतर आता फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या भारतीय फलंदाज विराट कोहलीकडून बाबरने शिकावे,” असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा: World Cup 2023: “भारताकडून काहीतरी शिका…”, विश्वचषकातील खराब कामगिरीवर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने PCBला सुनावले

बाबर आझमने याने दिले चोख प्रत्युत्तर

बाबर याने टीकेला उत्तर देताना सांगितले की, त्याच्या फॉर्मवर कधीही कर्णधारपदाचा परिणाम झाला नाही. पाकिस्तानी कर्णधार म्हणाला, “मी गेली तीन वर्षे माझ्या संघाचे नेतृत्व करत आहे आणि मला असे कधीच वाटले नाही. मी विश्वचषकात जशी कामगिरी करायला हवी होती तशी कामगिरी केली नाही, म्हणूनच लोक म्हणत आहेत की मी दडपणाखाली आहे. मला असे वाटत नाही की मी कोणत्याही दबावाखाली आहे किंवा यामुळे माझ्या फलंदाजीवर परिणाम झाला आहे. क्षेत्ररक्षण करताना मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. फलंदाजी करताना, मी धावा कशा कराव्या आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी मी विचार करतो.”

कर्णधारपदाबाबत केले सूचक वक्तव्य

कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या शक्यतेसह पाकिस्तानी पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड देताना बाबर खंबीर आणि संयमी दिसला. तो म्हणाला, “तुम्ही कोणत्या निर्णयाबद्दल बोलत आहात हे मला माहीत नाही. खेळाडूंच्या निवडीबाबत आम्ही येथे जो निर्णय घेतो तो प्रशिक्षक आणि कर्णधाराचा निर्णय असतो. आम्ही परिस्थितीनुसार संघाचा समतोल साधत असतो. कधी-कधी आम्ही यशस्वी होतो तर कधी कधी अपयशी होतो.”

कर्णधारपदावरून काढून टाकणे किंवा स्वतः हून सोडणे यावर बाबर म्हणाला, “एकदा आपण पाकिस्तानला गेलो की या यावर काय होते ते आपण पाहू, परंतु सध्या मी त्यावर फारसा विचार करत नाही. माझे लक्ष सध्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावर आहे.” बाबर (२८२ धावा) विश्वचषक मोहिमेमध्ये केवळ चार अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सुरुवात चांगली झाली पण त्याचे रुपांतर तो तीन-आकडी धावसंख्येमध्ये करू शकला नाही, ज्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 it is easy to give opinion on tv angry pakistan captain babar scolded him fiercely avw