Sourav Ganguly on Team India: सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे कारण, यजमानांनी स्पर्धेवर स्पष्टपणे वर्चस्व राखल्याचे दिसत आहे. आतापर्यंतच्या सर्व आठ सामन्यांमध्ये ते अपराजित राहिले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागात चांगली कामगिरी केली आहे. अनेक मोठ्या संघांविरुद्ध मोठे विजय नोंदवले आहेत. भारताचे सध्याचे गोलंदाजी आक्रमण मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम असल्याची चर्चा आहे. यावर सौरव गांगुलीचे वेगळे मत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या विश्वचषकात भारतासाठी निश्चितपणे छाप सोडणारा एक घटक म्हणजे त्यांचे वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. ज्यामध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. हे त्रिकूट खरोखरच जबरदस्त अशा स्वरुपाची गोलंदाजी करत आहे. त्यांनी या विश्वचषकात एकूण ४१ विकेट्स घेतल्या आहेत. एवढी चांगली कामगिरी केलेली असूनही माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते हे गोलंदाजी आक्रमण सर्वोत्कृष्ट नाही.

IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?
Stuart Binny scoring 31 runs in last over against UAE video viral
Stuart Binny : स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या षटकात पाडला ३१ धावांचा पाऊस, तरीही यूएईविरुद्ध भारताला पत्करावा लागला पराभव, पाहा VIDEO
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ravindra Jadeja surpasses Ishant and Zaheer in taking most Test wickets for India
Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने इशांत-झहीरला मागे टाकत केला मोठा पराक्रम, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पाचवा गोलंदाज
IND vs NZ 3rd test Washington Sundar Bowled Hattrick against Rachin Ravindra
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरने रचिन रवींद्रविरुद्ध नोंदवली हॅटट्रिक! सलग तिसऱ्या डावात उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल
Mukesh Kumar sensational 6 for 46 helps India A bowl Australia A out for 195 Runs INDA vs AUSA
INDA vs AUSA: मुकेश कुमारने ६ विकेट्स घेत केला कहर, ऑस्ट्रेलिया अ १९५ वर ऑलआऊट; भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशीच घेतला बदला

स्पर्धा आता बाद फेरीच्या दिशेने जात असताना, भारताचे सध्याचे गोलंदाजी आक्रमण मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम असल्याची चर्चा आहे. मात्र, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ही बाब स्पष्टपणे नाकारली आहे. त्याच्यामते २००३च्या विश्वचषकातील भारताचे गोलंदाजी आक्रमण सर्वोत्तम होते आणि त्याने हे उदाहरण देत स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: PAK vs ENG: “टीव्हीवर बसून मत मांडणं सोपं…”, बाबर आझमने टीकाकारांवर साधला निशाणा

गांगुली म्हणाला, “मी असे म्हणू शकत नाही की हे भारताचे आतापर्यंतचे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण आहे. २००३च्या विश्वचषकात आशिष नेहरा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनीही शानदार गोलंदाजी केली होती.” गांगुली पुढे म्हणाला, “होय, बुमराह, शमी आणि सिराजची गोलंदाजी पाहून खूप समाधान वाटत आहे. जेव्हा तुमच्याकडे बुमराह असेल तेव्हा खूप फरक पडतो. दोन्ही बाजूंनी दबाव असतो कारण तो नेहमी जोडीदाराला मदत करत असतो. बुमराहचा इतर दोघांवरही खूप मोठा प्रभाव पडला आहे.”

सध्या सुरू असलेल्या विश्वचषकाच्या पहिल्या चार सामन्यांसाठी शमीला संघातून वगळण्यात आले आले होते. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच स्टार वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करायला हवा होता, असे गांगुलीने मान्य केले. तो म्हणाला, “हो, शमीला प्लेइंग-११ मध्ये खूप आधी खेळायला हवे होते. त्याने केलेली ही प्रभावशाली कामगिरी पाहता त्याचे संघात असणे टीम इंडियासाठी फायद्याचे आहे”. टीम इंडिया आता रविवारी बंगळुरू येथे विश्वचषक २०२३च्या अंतिम साखळी टप्प्यातील सामन्यात नेदरलँड्सशी भिडणार आहे.

हेही वाचा: World Cup 2023: “भारताकडून काहीतरी शिका…”, विश्वचषकातील खराब कामगिरीवर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने PCBला सुनावले

सौरव गांगुलीचा मुद्दा इथे दुर्लक्षित करता येणार नाही. जेव्हा त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत २००३च्‍या विश्‍वचषकात शानदार कामगिरी केली होती, तेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. या स्पर्धेत झहीर खानने १८, श्रीनाथने १६ आणि आशिष नेहराने १५ विकेट्स घेतल्या होत्या.