IND vs PAK, World Cup 2023: पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेची स्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही आणि त्यामुळे इतर संघ तेथे खेळायला जाण्यास बराच वेळा संकोच करतात. दुसरीकडे, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहे. आतापर्यंत जरी आयसीसीने पीसीबीची कोणतीही गोष्ट मान्य केलेली नाही तरी, मात्र रोज नव्या मागण्या पाकिस्तान मांडतच आहे. आता पाकिस्तान सरकार आणि पीसीबीने भारतात खेळताना त्यांच्या संघाच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी आयसीसीकडून लेखी आश्वासन मागितले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आयसीसीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तानची स्वतःची परिस्थिती पाहता ही मागणी त्यांनी करणे म्हणजे हास्यास्पद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदकडून भारतात संपूर्ण सुरक्षा मिळेल असे लेखी आश्वासन मागणार असल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी ११ सदस्यीय पीसीबी समिती विश्वचषका खेळण्यासाठी साठी भारतात जायचे की नाही याचा निर्णय घेईल. वास्तविक, पाकिस्तान हे सर्व यासाठी करत आहे जेणेकरून ते भारतात असुरक्षित असल्याचे दाखवता यावे. याचे एक कारण म्हणजे बीसीसीआयने आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु आता या स्पर्धेतील केवळ ४ सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. सेमीफायनल आणि फायनलसह भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतात. यामुळे पीसीबी प्रचंड संतापले आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: के.एल. राहुल-श्रेयस अय्यरचे आशिया चषकात पुनरागमन होणार? सोमवारी BCCI निवड समिती घेणार मोठा निर्णय

पाकिस्तान सरकार आणि पीसीबीने आयसीसीकडून लेखी आश्वासन मागितले

२०२३च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानातून संघाच्या सहभागाबाबत अद्याप कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही. भारतात खेळण्यासाठी येणाऱ्या पाकिस्तानी संघाला मान्यता देण्यासाठी सरकारने १५ सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने आणि पीसीबीने आता भारतातील त्यांच्या संघाच्या सुरक्षेबाबत आयसीसीकडून लेखी आश्वासन मागितले आहे. मात्र, अद्यापपर्यंत आयसीसीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी पीसीबीने सुरक्षेचे कारण देत स्थळ बदलण्याची मागणी केली होती, तीही फेटाळण्यात आली होती.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निर्णय घेतला आहे की ते भारतातील सुरक्षेबाबत आयसीसीकडून लेखी आश्वासन मागतील. आशिया चषक स्पर्धेसाठी भारत पाकिस्तान दौरा करत नसल्यामुळे पाकिस्तान चिडला आहे. यापूर्वीही पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. यामुळे जरी भारत किंवा इतर कोणत्याही संघाचे नुकसान होणार नसले तरी त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसणार आहे. पीसीबी म्हणाले आयसीसीला की, “जर तुम्ही आमच्या संघाच्या सुरक्षेची लेखी स्वरुपात हमी देत असला तरच आम्ही विश्वचषकात सहभागी होऊ.”

हेही वाचा: World Cup 2023: मोठी बातमी! सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली, ‘या’ दिवशी रंगणार महामुकाबला

पाकिस्तानच्या सामन्यांच्या तारखा बदलू शकतात

एकदिवसीय विश्वचषकाबाबत आयसीसीने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला होणारा सामना १४ तारखेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. याशिवाय, वेळापत्रकात काही बदल होऊ शकतात, ज्यामध्ये पाकिस्तानच्या आणखी दोन सुरुवातीच्या सामन्यांच्या तारखेत बदल होण्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 pakistans tantrums are not reducing going to put this demand in front of icc avw