ICC World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अखेर विश्वचषकात प्रवेश केला आहे. जरी पंत आयसीसी मेगा इव्हेंटमध्ये मैदानावर खेळाडूंना साथ देऊ शकणार नसला तरी, अलीकडे विश्वचषक मोहिमेपूर्वी पंत आपल्या सहकारी खेळाडूंना प्रेरित करताना दिसत आहे. क्रिकेट महाकुंभ सुरू होण्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने आपला एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात तो विविध जाहिरातींमध्ये काम करताना दिसत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऋषभ पंत कार अपघाताचा बळी ठरला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे, परंतु आता तो पूर्णपणे निरोगी आणि बरा झाला आहे. पंत विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ड्रीम ११च्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसला होता. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर यष्टीरक्षक इशान किशन आणि सलामीवीर फलंदाज शुबमन गिलही दिसत आहेत.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

बीसीसीआयने ट्वीटरवर एक प्रमोशनल व्हिडिओ जाहीर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो मेंढपाळाच्या म्हणजेच शेळीपाल्याच्या अवतारात दिसत आहे. पंतने टीम इंडियाची बस वाटेत थांबवली आणि शुबमन आणि इशानने त्याला कारण विचारले, “अरे रिशु, तू इथे का थांबलास, सराव मैदान अजून १५ किलोमीटर दूर आहे.” याला उत्तर देताना पंत म्हणतो, “भाऊ, वर्ल्ड कप आहे, थोड्या धावा कर, तुझा अतिरिक्त सराव होईल. GOAT (सर्वकालीन महान) बनायचे की नाही.” दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभला आजकाल संघासोबत अनेकदा पाहिले गेले आहे. आशिया चषकापूर्वीच तो संघाला भेटण्यासाठी एनसीएमध्ये पोहोचला होता. यानंतर तो विश्वचषकापूर्वीच खेळाडूंना प्रेरित करताना दिसतो. क्रिकेट चाहते ऋषभ पंतच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रोहित शर्माचा सर्व संघांसाठी संदेश

रोहित शर्माने सर्व संघांच्या कर्णधारांना सांगितले, “येथे बसलेल्या सर्व कर्णधारांना आपल्या देशातील चाहत्यांना आनंद द्यायचा आहे. एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मी सर्वांना एका गोष्टीची खात्री देतो की भारतातील लोक सर्व संघांवर प्रेम करतील आणि स्टेडियम खचाखच भरले जातील. भारतीय लोक क्रिकेट खेळावर खूप प्रेम करतात. तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे.” ५ ऑक्टोबरपासून चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. तर १४ ऑक्टोबरला भारताचा पाकिस्तानशी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा: World Cup 2023: ‘कॅप्टन डे’च्या आधी बाबर आझम रोहित शर्माला भेटला; म्हणाला, “मला घरापासून…”, Video व्हायरल

पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे

विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळणार असून गुरुवारपासून (५ ऑक्टोबर) सुरुवात होणार आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

Story img Loader