ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात एक मोठा अपडेट समोर आला आहे. बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सुपूर्द केला असून, सर्व सदस्य देशांनी त्यावर सहमती दर्शवल्यानंतर ते अंतिम स्वरूपात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार हेही स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावेळी जगाचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने वर्ल्ड कपचे वेळापत्रक ठरवून ते आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीने हे वेळापत्रक स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व देशांना पाठवले आहे.

वर्ल्ड कप २०२३चे वेळापत्रक समोर आले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाईल. या मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. टीम इंडिया आपले ९ सामने ९ वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहे. त्याचवेळी १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार आहे. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानविरुद्धचे सामने ५ ठिकाणी होणार आहेत.

हेही वाचा: WTC 2023 Final: आयपीएलमुळे टीम इंडिया हरली का? रोहित म्हणाला की “ आम्हाला किमान २०-२५ दिवस तयारीसाठी…”

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. १५ आणि १६ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होणार असून, कोणाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. यजमान भारत त्यांचे साखळी सामने कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूसह ९ शहरांमध्ये खेळतील. दुसरीकडे पाकिस्तानचे साखळी सामने ५ शहरांमध्ये होणार आहेत. रिपोर्टनुसार, पाकिस्तान ६ आणि १२ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये क्वालिफायर फेरीतून येणारे दोन संघ खेळतील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (२० ऑक्टोबर), चेन्नईमध्ये अफगाणिस्तान (२३ ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका (२७ ऑक्टोबर), कोलकात्यात बांगलादेश (३१ ऑक्टोबर), बंगळुरूमध्ये न्यूझीलंड (५ नोव्हेंबर) आणि कोलकात्यात इंग्लंड (१२ नोव्हेंबर) खेळेल.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २९ ऑक्टोबरला धरमशाला आणि इंग्लंडविरुद्ध ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत आणि दोन पात्रता फेरीतून येतील. ही स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्याचे वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे, तर गेल्या दोन विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर ठरवले गेले होते.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “चार दिवस टीम इंडिया लढली पण पाचव्या दिवशी …” भारताच्या पराभवानंतर BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नींचे मोठे विधान

भारताचे संभाव्य वेळापत्रक:

विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई

विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली

विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद

विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे</p>

विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धरमशाला

विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनऊ

विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई

विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता

विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 schedule of world cup 2023 came out ind vs pak match will be played on date of october 15th avw