ODI World Cup Warm-up Matches 2023 Schedule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. आयसीसीने बुधवारी (२३ ऑगस्ट) सांगितले की, विश्वचषकाच्या मुख्य सामन्यांपूर्वी १० सराव सामने खेळवले जातील. भारतीय संघ इंग्लंड आणि नेदरलँड्सविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. ३० सप्टेंबरला गुवाहाटीमध्ये त्याचा सामना इंग्लंडशी आणि ३ सप्टेंबरला तिरुअनंतपुरममध्ये नेदरलँडशी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

५ ऑक्टोबर रोजी विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, १० संघ प्रत्येकी ५० षटकांचे दोन सराव सामने खेळतील. भारतातील तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरमसह हैदराबादलाही सराव सामन्यांचे यजमानपद मिळाले. साखळी फेरीचे तीन सामनेही हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत. या मैदानावर पाकिस्तानचा सामना ६ ऑक्टोबरला नेदरलँडशी आणि १० ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी नेदरलँड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने असतील.

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सराव सामना

२९ आणि ३० सप्टेंबर व्यतिरिक्त २ आणि ३ ऑक्टोबरला सराव सामने खेळवले जातील. पहिल्या सराव सामन्यात बांगलादेशचा संघ श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. त्याच दिवशी दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. सर्व सामने दुपारी २ वाजल्यापासून खेळवले जातील. या दरम्यान, सर्व संघांना १५ खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी असेल.

हेही वाचा: Asia Cup 2023: रोहित-विराट यांच्यासह ‘या’ खेळाडूंची होणार फिटनेस टेस्ट, आशिया चषकाआधी NCAचा मोठा निर्णय

भारतातील १० शहरांमध्ये ही स्पर्धा रंगणार

विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे सामने होणार आहेत. सलामीचा सामना अहमदाबादमध्ये ५ ऑक्टोबरला तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका आणि नेदरलँडचे संघ पात्रता फेरीतून या स्पर्धेत पोहोचले आहेत.

विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात खेळला जाणार आहे

या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांबरोबर राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळतील. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लिश संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला करून वर्ल्डकप २०१९च्या ट्रॉफीवर नाव कोरले होते.

हेही वाचा: Asia cup 2023:  आशिया चषकात युजवेंद्र चहलला वगळल्याने हरभजन सिंग संतापला; म्हणाला, “त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज…”

सराव सामन्यांचे वेळापत्रक

तारीख सामने ठिकाण
२९ सप्टेंबरबांगलादेश विरुद्ध श्रीलंकागुवाहाटी
२९ सप्टेंबरदक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तानतिरुवनंतपुरम
२९ सप्टेंबरन्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानहैदराबाद
३० सप्टेंबरभारत विरुद्ध इंग्लंडगुवाहाटी
३० सप्टेंबरऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँडतिरुवनंतपुरम
२ ऑक्टोबरइंग्लंड विरुद्ध बांगलादेशगुवाहाटी
२ ऑक्टोबरन्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिकातिरुवनंतपुरम
३ ऑक्टोबरअफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकागुवाहाटी
३ ऑक्टोबरभारत विरुद्ध नेदरलँडतिरुवनंतपुरम
३ ऑक्टोबरपाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाहैदराबाद
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 schedule of world cup practice matches released india will play against england and netherlands avw
Show comments