अहमदाबाद : भारताचा सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूतून सावरला असून त्याने गुरुवारी तासभर नेट्समध्ये सराव केला. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. डेंग्यूची लागण झाल्याने २२ वर्षीय गिल विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या बहुचर्चित सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> ND vs PAK, World Cup 2023: ‘… मी कॅन्सरमध्येही विश्वचषक खेळलो, तू ही तयार रहा’; युवराज सिंगने शुबमन गिलला दिले बळ

भारताचे अन्य खेळाडू अहमदाबाद येथे पोहोचण्यापूर्वी संघ व्यवस्थापनाने गिलसाठी विशेष सराव सत्राचे आयोजन केले होते. ‘थ्रोडाउन’ विशेषज्ञ नुवान सेनेविरत्नेला बुधवारीच अहमदाबादला जाण्यासाठी सांगण्यात आले होते. गिल गुरुवारी सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखल झाला. भारतीय संघाचे डॉक्टर रिझवान यांच्या देखरेखीखाली थोडा व्यायाम केल्यानंतर त्याने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला. पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीला लक्षात घेऊन सेनेविरत्नेच्या १५० किमीच्या गतीने येणाऱ्या ‘थ्रोडाउन’विरुद्ध गिलने सराव केला. याशिवाय काही स्थानिक गोलंदाजांचाही त्याने सामना केला. सरावादरम्यान त्याला फारशी अडचण जाणवली नाही.

Story img Loader