Sunil Gavaskar on Cricket Experts: टीम इंडिया आणि भारतातील क्रिकेटबाबत प्रत्येकजण आपापली मते मांडत असतो. भारतीय संघाची क्रिकेट विश्वचषक २०२३साठी घोषणा होताच या चर्चांना जोर आला आहे. हा विषय मुख्यतः भारतीय क्रिकेट संघाभोवती फिरतो, जो यजमान या नात्याने विश्वचषक विजेतेपदासाठी सर्वात आवडत्या संघांपैकी एक आहे. तसेच, विश्वचषक जिंकण्याचा एक दावेदार देखील मानला जातो. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि १९८३ क्रिकेट विश्वचषक विजेते सुनील गावसकर परदेशी तज्ज्ञांवर संतापले आहेत. भारतीय संघाच्या टीम कॉम्बिनेशनबाबत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू उलट-सुलट प्रतिक्रिया देत आहेत. यावर गावसकरांनी परदेशी तज्ज्ञांना खडेबोल सुनावले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) माजी प्रमुख नजम सेठी यांनी ट्वीटर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास घाबरतो.” यासंबंधीच्या प्रश्नावर गावसकर संतापले. स्पोर्ट्स टुडेशी संवाद साधताना सुनील गावसकर म्हणाले, “जर आपण त्यांच्या बाजूने येणारी विधाने पाहिली तर, आमची माध्यमे त्यांना महत्त्व देतात, हे खेदजनक आहे. भारतीय संघात कोणाची निवड करावी यासाठी आमच्याकडे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत? हा त्यांच्या चिंतेचा विषय कसा असू शकतो? भारतीय खेळाडू जाऊन ऑस्ट्रेलियन किंवा पाकिस्तान संघ निवडतो का? हे त्यांचे काम नसून त्यांनी यामध्ये पडू नये. मात्र, आपण त्यांना मते विचारून मध्ये पडण्याची परवानगी देतो.”
लिटिल मास्टर गावसकर पुढे म्हणाले की, “विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापेक्षा बाबर सरस असल्याची विधाने नेहमीच येत असतात. शाहीन आफ्रिदी चांगला गोलंदाज आहे. इंझमाम-उल-हक सचिन तेंडुलकरपेक्षा सरस आहे, असेही मी काही वर्षांपूर्वी ऐकले होते. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू नेहमीच आपल्यापेक्षा जास्त चांगले वाटतात. आपल्या माध्यमांनी त्यांना कुठलेही मते टीम इंडियाबाबत विचारायला जाऊ नये, हाच काय तो एक मार्ग मला यातून दिसतो. असे विचारून तुम्ही भारतीय संघावर आणखी दबाव टाकत आहात. आमच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही असे कुठलेही विधान करू नये, असे मला ऑस्ट्रेलिया-पाकिस्तानच्या क्रिकेट तज्ज्ञांना सांगायचे आहे.”
सुनील गावसकर परदेशी क्रिकेट खेळाडूंना म्हणाले की, “तुमच्या सल्ल्याची गरज नाही, उगाचच आमच्या मध्ये पडू नका. हा आमच्या देशाचा, संघाचा आणि बीसीसीआयच्या कार्यभाराचा एक भाग आहेत. त्यामुळे यावर कुठलीही टिपण्णी दुसऱ्या देशाच्या क्रिकेट तज्ज्ञाने जरी केली तरी यावर माध्यमांनी चर्चा करू नये. टीम इंडियाबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही घेऊ.”
गावसकर पुढे म्हणाले, “तुमच्या बातम्यांमध्ये त्यांना जागा देऊ नका. तुमच्याकडे अशी बातमी आहे का? हा खेळाडू तुमच्या संघात असावा असे दक्षिण आफ्रिकेचे म्हणणे आहे, नाही. ऑस्ट्रेलियन म्हणतात की हे असे व्हायला हवे होते तसे व्हायला हवे होते, हे अनेकदा घडते. ते म्हणतात की, तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर कोणी फलंदाजी करावी. चला, यावर मी त्यांना म्हणतो की आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही.”