ICC World Cup 2023: आयसीसी २०२३ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाचा पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याच वेळी, ही स्पर्धा १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
२०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या शेड्यूल लॉन्चिंग कार्यक्रमादरम्यान, आयसीसीचे सीईओ ज्योफ अलर्डिस, बीसीसीआय सचिव जय शाह, श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते. लाँचिंग इव्हेंटमध्येच सेहवागने उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांबाबत वक्तव्य केले.
सेहवागच्या मते ‘हे चार संघ अंतिम फेरीत पोहचतील
आयसीसीच्या या कार्यक्रमात सेहवागने सांगितले की, “यावेळी वर्ल्ड कपमध्ये कोणते चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील? हे जरी सांगणे जरी कठीण असले तरी माझ्यामते भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड उपांत्य फेरी गाठतील.” सेहवागच्या मते, “इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतात कारण त्यांचे खेळाडू थेट आक्रमक फलंदाजी करतात आणि काही आयपीएलमध्ये देखील खेळले आहेत.”
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे
२०२३ एकदिवसीय विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत खेळवला जाईल. आणि दुसरा सेमीफायनल सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये खेळवला जाईल. यानंतर १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना होणार आहे. उपांत्य किंवा अंतिम सामन्यावर पावसाची छाया राहिल्यास हा सामना दुसऱ्या दिवशी होणार आहे. वास्तविक, आयसीसीने सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवसाचा नियम ठेवला आहे.
भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. ४६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ४५ साखळी सामने आणि तीन बाद फेरीचे सामने खेळवले जातील. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धरमशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे येथे एकूण ४८ सामने आयोजित केले जातील. तीनही बाद फेरीचे सामने दिवस-रात्र असतील. हे सामने स्थानिक वेळेनुसार दुपारी २.०० वाजता सुरू होतील. दोन सेमीफायनल आणि फायनलला राखीव दिवस असतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार सामना न झाल्यास असून २० नोव्हेंबरला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना रविवार, १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या वाढदिवसानिमित्त हा सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यापूर्वी १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५ आणि २०१९ मध्ये सात वेळा आमनेसामने आले आहेत.