India World Cup Squad: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडकर्त्यांसमोर संघ निवडीचे आव्हान आहे. १५ सदस्यीय संघात अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून कोणाचा समावेश होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शार्दुल ठाकूर आणि जयदेव उनाडकट हे आघाडीवर असले तरी दोघांपैकी एकाचीच निवड केली जाईल. आता शार्दुल-उनाडकटबाबत निवड समिती काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. वर्ल्डकपला फक्त ५७ दिवस बाकी राहिले असून अजूनही भारताला परफेक्ट प्लेईंग ११ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडिया कशी विश्वचषक जिंकणार? असे चाहते प्रश्न विचारात आहेत.

जोपर्यंत संघ निवडीचा प्रश्न आहे, आयसीसीच्या नियमांनुसार, ५ सप्टेंबरपर्यंत, सर्व देशांना विश्वचषकासाठी त्यांची प्रारंभिक १५ खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. २७ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक यादीतील बदलांना परवानगी असेल. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया मालिका २७ सप्टेंबर रोजी संपणार आहे आणि प्राथमिक यादीत बदल करण्याची ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अंतिम संघ निवडण्यापूर्वी भारत आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी जवळपास १६ ते १८ सदस्यांसह गेला तर आश्चर्य वाटायला नको.

Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
job creation under modi government in 100 days
समोरच्या बाकावरुन : १०० दिवसांत बेकारीची शंभरी भरली नाहीच!
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
Rahul Dravid son Samit included in team india
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली संधी
Duleep Trophy 2024 Mohammed Siraj Umran Malik Out Due To Illness and Ravindra Jadeja Released
Duleep Trophy: दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघातील ३ खेळाडूंना केलं रिलीज, काय आहे कारण?
ICC Announces Womens T20 World Cup 2024 Schedule India vs Pakistan Match on October 6
Womens T20 WC 2024: भारत पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, ICC ने जाहीर केलं T20 World Cupचे वेळापत्रक

भारत दोन महिन्यांनंतर पहिला सामना खेळणार आहे

भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. या सामन्याला दोन महिने झाले असले तरी अजूनही संघाचा समतोल झालेला नाही. भारतीय संघ व्यवस्थापनासमोर अनेक आव्हाने आहेत. दुखापतग्रस्त फलंदाज के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांची उपलब्धता निश्चितच भारताला विजेतेपदाच्या दावेदारांपैकी एक बनवेल. अतिरिक्त वेगवान गोलंदाज आणि तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून १५ जणांच्या संघात कोणाचा समावेश करायचा हे भारतीय निवडकर्त्यांसमोर आव्हान आहे.

हेही वाचा: IND vs WI 3rd T20: हुश्श! जिंकलो एकदाचे; सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, भारताचा वेस्ट इंडीजवर सात विकेट्सने विजय

भारतीय संघाच्या ताफ्यातील संभाव्य वेगवान गोलंदाजी आक्रमण

जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन करत आहे. आयर्लंडमध्ये तीन टी२० सामन्यांमध्ये तो टीम इंडियाचे नेतृत्व करेल. ८० टक्के तो तंदुरस्त झाला असून आता तो विश्वचषक खेळणार आहे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसह हे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज वर्ल्ड कप खेळणार आहेत. हार्दिक पांड्या हा संघातील चौथा वेगवान गोलंदाज असेल आणि प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून किमान सहा ते आठ षटके टाकणे अपेक्षित आहे.

तिसरा फिरकीपटू कोण असेल?

रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची भारतीय संघात मुख्य फिरकीपटू म्हणून निवड होण्याची खात्री आहे. तिसऱ्या फिरकीपटूसाठी युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्यात स्पर्धा आहे. वास्तविक, अक्षर पटेल जडेजाप्रमाणे गोलंदाजी करतो. तोही त्याच्यासारखी उपयुक्त खेळी खेळू शकतो. अशा स्थितीत एकाच प्रकारचे दोन खेळाडू संघात ठेवणे कठीण होणार आहे. अक्षर राखीव खेळाडू म्हणून निवडला जाऊ शकतो. चहल त्याच्या लेग-स्पिनने भरपूर वैविध्य आणतो आणि त्याचा संघाला फायदा होऊ शकतो.

शार्दुल कामगिरी इतर गोलंदाजांच्या गुणवत्तेच्या तुलनेत खूप पुढे आहे. त्याने वेस्ट इंडिजमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेऊन आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. मात्र, या सेटअपमध्ये उनाडकटच्या बाजूने जाणारी एक गोष्ट म्हणजे तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. मात्र, त्याचवेळी शार्दुलची फलंदाजी क्षमताही त्याच्या बाजूने आहे. हा खूप मोठा पेचप्रसंग बीसीसीआय निवड समितीसमोर आला आहे.

हेही वाचा: जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये नीरजवर भारताची भिस्त

विश्वचषकासाठी संभाव्य मुख्य खेळाडूंचा गट

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, युजवेंद्र चहल.