Ravichandran Ashwin: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. संघात फारसे बदल करण्यात आलेले नाहीत. आशिया चषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश खेळाडूंना या मालिकेत संधी देण्यात आली आहे. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह हार्दिकसारख्या खेळाडूंना पहिल्या दोन वन डेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघातील सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे रविचंद्रन अश्विन. अश्विनशिवाय ऋतुराज गायकवाडलाही संधी देण्यात आली आहे, मात्र तो आशियाई क्रीडा स्पर्धेतह संघाचे नेतृत्व करणार आहे. अशा परिस्थितीत त्याला या मालिकेत संधी मिळणे महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३७ वर्षीय अश्विनचे नाव विश्वचषकाच्या शर्यतीत ​​आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. २०१७ मध्ये त्याला भारताच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो फक्त दोनच एकदिवसीय सामने खेळला आहे. २०२२ मध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. अश्विन कसोटीत जरी भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला असला तरी एकदिवसीय आणि टी२० मध्ये तो फार कमी सामने खेळला आहे.

२०१७ मध्ये एकदिवसीय आणि टी२० संघातून वगळल्यानंतर, त्याने २०२१ टी२० विश्वचषक खेळला, परंतु त्याला तीन सामन्यांमध्ये फक्त सहा विकेट्स घेता आल्या. त्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही. यानंतर अश्विनला भारतीय टी२० संघात नियमित संधी मिळाली, पण तो १६ सामन्यांमध्ये केवळ १४ विकेट्स घेऊ शकला. त्याचा इकॉनॉमी रेट सातच्या वर होता. अशा परिस्थितीत २०२२च्या टी२० विश्वचषकानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. २०२२च्या टी२० विश्वचषकातील सहा सामन्यांमध्ये त्याने सहा विकेट्स घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट आठपेक्षा जास्त होता. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने एक महत्त्वाची धाव काढली, पण याशिवाय फलंदाजीत तो काही विशेष करू शकला नाही. आता त्याला पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये संधी मिळू शकते.

हेही वाचा: Asian Games 2023, IND vs MAL: शफाली वर्माचे शानदार अर्धशतक! पावसामुळे सामना रद्द, टीम इंडिया चांगल्या रँकिंगच्या जोरावर पोहोचली सेमीफायनलला

काय आहे रोहित-अजित आगरकरचा प्लॅन?

एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे, जिथे बहुतेक मैदानातील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. भारताच्या सध्याच्या विश्वचषक संघात तीन फिरकी गोलंदाज आहेत. तिघेही डाव्या हाताचे आहेत. जडेजा आणि अक्षर प्रत्येक बाबतीत जवळपास सारखेच आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा फिरकी खेळपट्टीवर तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाईल, तेव्हा अक्षर आणि जडेजा यांना एकत्र खेळणे कठीण होईल. आशिया चषकातही अक्षर काही विशेष करू शकला नाही. कर्णधाराने त्याला षटकेही पूर्ण करायला लावली नाहीत, असे दिसून आले. आता अक्षर दुखापतग्रस्त असल्याने त्याला तंदुरुस्त होणे कठीण आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांना अश्विनला तिसरा फिरकीपटू पर्याय म्हणून तयार ठेवायचा आहे.

जर अक्षर पटेल वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर त्याच्या जागी अश्विनचा विश्वचषक संघात समावेश केला जाऊ शकतो. अश्विनही फलंदाजीतउपयुक्त खेळी खेळण्यास सक्षम आहे. संघात त्याच्या आगमनामुळे फिरकी गोलंदाजीत विविधता येईल. तो विशेषतः डावखुऱ्या फलंदाजांना त्रासदायक ठरू शकतो. याच कारणामुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास ठेवत आहे.

हेही वाचा: Sumit Nagal: दुर्दैवी! भारताच्या पहिल्या क्रमांकाच्या टेनिसपटूला सतावतेय आर्थिक विवंचना; म्हणाला, “माझ्या खात्यात फक्त…”

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी)

लोकेश राहुल (कर्णधार/विकेटकीपर) शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध्द कृष्णा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या सामन्यासाठी

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, कुलदीप यादव., अक्षर पटेल (फिटनेसबद्दल शंका), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup ashwin who played two odis in six years and returns after 21 months what is rohit agarkars plan find out avw
Show comments