ICC World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी आतापर्यंतच्या विश्वचषकात फारशी म्हणावी तशी चांगली झालेली नाही. नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्ध संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानी संघ दडपणाखाली आहे. त्या दरम्यान ड्रेसिंग रुममध्येही भांडण झाल्याच्या बातम्या येत होत्या. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हे वृत्त फेटाळून लावले आहे.

पीसीबीने सोमवारी राष्ट्रीय संघातील मतभेद आणि अंतर्गत संघर्षाचे वृत्त फेटाळून लावले. पीसीबीने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघातील कोणत्याही अंतर्गत मतभेदाच्या चर्चांना नकार देत एक स्पष्टीकरण जाहीर केले. संघातील मतभेदाच्या अफवांमुळे पीसीबीला परिस्थिती स्पष्ट करणे भाग पडले आहे. पाकिस्तानमधील काही पत्रकारांनी संघातील कथित भांडणाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पत्रकारांनी सोमवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर अधिक तपशील देण्याचे आश्वासन दिले.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Mohammad Rizwan Says I am only a captain for toss and presentation
Mohammad Rizwan : ‘मी फक्त टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी कर्णधार…’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद रिझवानचे मोठे वक्तव्य
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…
Champions Trophy Mohammed Hafeez Big Statement About India wont travel to Pakistan Said Somehow Not Secure for India
Champions Trophy: “भारतीय संघासाठी पाकिस्तान सुरक्षित नाही…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूच्या पोस्टने उडाली खळबळ, PCBला दाखवला आरसा
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

हेही वाचा: PAK vs AFG: पाकिस्तानला उमगला ‘पॉवर प्ले’चा अर्थ! तब्बल ११६८ चेंडूंनंतर मारला षटकार, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

पीसीबीने निराशा व्यक्त केली

या पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, दोन खेळाडू एकमेकांशी भिडले त्यामुळे संघातील कलह वाढला आहे. यानंतर कर्णधार बाबरला खेळाडूंच्या गटातून परकेपणाचा सामना करावा लागत आहे. पीसीबीच्या प्रसिद्धीनुसार, “माध्यमांच्या एका विभागाद्वारे प्रसारित केलेल्या अफवांच्या विरोधात, पीसीबी स्पष्टपणे आश्वासन देते की संघ एकजूट आहे आणि या निराधार दाव्यांसाठी कोणतेही पुरावे नाहीत.” यामुळे अशा बातम्यांचे आम्ही खंडन करतो आहे.

अशी बातमी आशिया चषकादरम्यानही आली होती

पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूमबद्दल अशा बातम्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. आशिया चषकातील पराभवानंतर बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा होती. त्यानंतर शाहीनने गोलंदाजांच्या टीकेवर बाबरशी वाद घातला होता. मात्र, नंतर हे दोन्ही खेळाडू अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. त्यामुळे ही चर्चा या खोट्या असल्याचे नंतर सिद्ध झाले.

हेही वाचा: World Cup Points Table: भारतीय संघ उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर, आज पाकिस्तान हरला तर बाद होणार? समीकरण जाणून घ्या

अफगाणिस्तानला कठीण लक्ष्य मिळाले

पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात गडी गमावून २८२ धावा केल्या. त्याने अफगाणिस्तानला २८३ धावांचे कठीण लक्ष्य दिले. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी अर्धशतके झळकावली. बाबरने सर्वाधिक ७४ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ५८ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार फलंदाजी करत संघाला २८२ धावांपर्यंत नेले. दोघांनी ४०-४० धावांचे योगदान दिले. सौद शकीलने २५ आणि इमाम उल हकने १७ धावा केल्या. मोहम्मद रिझवानला केवळ आठ धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी तीन धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन आणि नवीन उल हकने दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.