India vs Australia World Cup Final 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा विजय रथ ऑस्ट्रेलियाने रोखला. भारताच्या या पराभवानंतर सर्वच खेळाडूंची निराशा झाली. कर्णधार रोहित आणि मोहम्मद सिराज यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. रोहितची ही निराशा सामन्यानंतरही दिसून आली. मात्र, पराभव झाला असला तरी या भारतीय संघाचा आपल्याला अभिमान असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आईची तब्येत बिघडली आहे. शमीच्या बहिणीने प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची आई अंजुम आरा आजारी पडली. यानंतर कुटुंबीय त्याला जोया येथील डॉक्टरांकडे घेऊन गेले. काही चाचण्यांनंतर त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले. विश्रांती घेतल्यानंतर ती घरी परतली. सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर पुन्हा त्याच्या आईची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याच्या आईला इस्पितळात दाखल करण्यात आले. शमीची बहीण शबिना खातून यांनी सांगितले की, “त्यांची आई अंजुम आराला दोन दिवसांपासून सौम्य ताप होता. सकाळी ताप वाढला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना अधिक वेदना जाणवल्या. यानंतर तिला झोया येथील रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी औषधे घेऊन परत आल्याचे शबीनाने सांगितले. त्यानंतर आता पुन्हा आईची तब्येत बिघडली त्यामुळे पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. सध्या प्रकृती चांगली असल्याचे तिने सांगितले.”

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय? शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले…
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Dhananjay Mahadik On Ladki Bahin Yojana
Dhananjay Mahadik : Video : “लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर..”, भाजपा खासदार धनंजय महाडिकांचं वादग्रस्त विधान
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच

हेही वाचा: IND vs AUS Final: सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराह झाला निराश, रागाच्या भरात स्टंपवरील बेल्स उडवली; पाहा Video

काय घडलं मॅचमध्ये?

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकात ४ विकेट्स गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने १४१ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या. मिचेल मार्श १५ धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५१ धावा केल्या.

हेही वाचा: IND vs AUS Final: अंतिम फेरीतील पराभवानंतर रोहित-सिराजला अश्रू अनावर; सचिन तेंडुलकरने केले टीम इंडियाचे सांत्वन

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. त्याचवेळी भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाचा शेवटचा पराभव २००३ मध्ये झाला होता.