क्विटो (इक्वेडोर) : बचावपटू बायरन कॅस्टिलोच्या संघातील उपस्थितीवर परिणाम होणार असल्याचे मान्य करत प्रशिक्षक अल्फारो गुस्ताव यांनी मंगळवारी कॅस्टिलोशिवाय विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी इक्वेडोरच्या संघाची घोषणा केली. इक्वेडोर संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरल्यापासून कॅस्टिलोच्या समावेशावरून वादळ निर्माण झाले होते. कॅस्टिलो हा प्रामुख्याने कोलंबियाचा खेळाडू असल्याची तक्रार करण्यात आली होती. चिली आणि पेरू देशांच्या फुटबॉल संघटनांनी याबाबत तक्रार केली होती. कॅस्टिलो कोलंबियाचा असून, तो बेकायदेशीररीत्या इक्वेडोरकडून खेळल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. यानंतरही कॅस्टिलोचा संघातील समावेश निश्चित मानला जात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्याच आठवडय़ात क्रीडा लवादाने कॅस्टिलोविरुद्ध निकाल दिला. पारपत्रामध्ये जन्मदिवस आणि स्थानाविषयी कॅस्टिलोने चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. यानंतरही कॅस्टिलोला इक्वेडोरने संघात स्थान दिले, तर पुढील २०२६च्या विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीला सुरुवात होण्यापूर्वीच इक्वेडोरला तीन गुण गमवावे लागतील, असे या निर्णयात म्हणण्यात आले आहे.

संघ

गोलरक्षक : मोझेस रामिरेझ, अ‍ॅलेक्झांडर डॉमिनग्वेझ, हेर्नन गालिंदेझ

बचावपटू : पिएरो हिन्सापिए, रॉबर्ट अबरेलेडा, पर्विस इस्टुपिनान, एंजेलो प्रिकाडो, जॅक्सन पोरोझो, झेविएर अरेगा, दिएगो पॅलासिओस, फेलिक्स टोरेस, विल्यम पाचो

मध्यरक्षक : कार्लोस ग्रएझो, जोस सिफ्युएनेटस, झेग्सन मेंडेझ, मोझेस कायसेडो, जेर्मी सार्मिएण्टो, अ‍ॅलन फ्रॅंको, एंजल मेना, आयर्टन प्रिसाडो, गोन्झालो प्लाटा, रोमारियो इबारा

आघाडीपटू : जोकाएफ रिआस्को, इन्नेर व्हॅलेन्सिया, केविन रॉड्रिगेझ, मायकेल इस्ट्राडा