World cup 2023 and PCB: विश्वचषकाच्या ४४व्या सामन्यात पाकिस्तानसमोर इंग्लंडचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचे आठ सामन्यांत चार गुण आहेत. त्याचबरोबर इंग्लंड आठ सामन्यांतून चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या सामन्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने पीसीबीला खडेबोल सुनावत झका अश्रफ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानची विश्वचषक २०२३मधील मोहीम फारच निराशाजनक झाली आहे. संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी संघावर टीका केली आहे. दरम्यान, त्यात आणखी एक नाव सामील झाले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने भारताचे कौतुक करत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीला टोमणा मारला आहे.
पाकिस्तानी संघाने यजमान भारताकडून काहीतरी शिकले पाहिजे, असे शोएब मलिकचे मत आहे. तो म्हणाला की,”भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने प्रत्येक विभागात आपले सर्वोत्तम दिले असून बीसीसीआयने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे.” मलिक पुढे म्हणाला की, “भारतीय संघाची योजना ही उत्तम होती. त्यांनी आतापर्यंत सलग आठ विजय नोंदवत हे सिद्ध केले की, आम्हीच खरे विश्वचषकाचे दावेदार आहोत.”
‘ए’ स्पोर्ट्सवरील वाहिनीवर बोलताना माजी कर्णधार मलिक म्हणाला की, “भारताने या विश्वचषकात प्रत्येक विभागात कोणता खेळाडू चांगले प्रदर्शन करू शकेल याची उत्तम योजना आखली होती. विरोधी संघाचा त्यांनी खूप अभ्यास केला होता. मी फक्त गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यावर बोलत नाही. त्यांचे खेळाडूही जखमी झाले पण त्यांच्याकडे प्लॅन बी तयार ठेवण्यात आला होता. खेळाडूंचा समूह असणे महत्त्वाचे आहे आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यातूनचं पीसीबीने भारताकडून काहीतरी शिकायला हवे, असे माझे मत आहे.”
दोन्ही संघांची प्लेइंग-११
इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार /यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद.
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हारिस रौफ.