World Cup Shooting Competition कैरो : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सलग चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी आपले वर्चस्व राखले. स्पर्धेत चौथ्या दिवशी बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने सुवर्णपदक पटकावले. भारताचे स्पर्धेतील हे सहावे पदक होते. यामध्ये चार सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकाची समावेश आहे. भारत पदकतालिकेत आघाडीवर आहे.

भारताच्या २२ वर्षीय ऐश्वर्यने गेल्यावर्षी देखील विश्वचषक स्पर्धेत सोनेरी यश मिळवले होते. यावेळी अंतिम लढतीत ऐश्वर्यने ऑस्ट्रियाच्या अॅलेक्झांडर श्मिर्लचा १६-६ असा पराभव केला. त्यापूर्वी, मानांकन फेरीत ४०६.४ गुणांसह ऐश्वर्यने दुसऱ्या क्रमांकाने सुवर्णपदकासाठी श्मिर्लला आव्हान दिले. श्मिर्ल ४०७.९ गुणांसह सर्वप्रथम अंतिम फेरीत दाखल झाला होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

त्यापूर्वी, पात्रता फेरीत ऐश्वर्यने ५८८ गुणांसह आघाडीच्या क्रमांकाने मानांकन फेरीत प्रवेश केला होता. पात्रता फेरीत भारताचा अखिल शेरॉन ५८७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, मानांकन फेरीत अखिल आव्हान राखू शकला नाही.

Story img Loader