Virender Sehwag: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (५ ऑक्टोबर) वन डे विश्वचषकाच्या १३व्या आवृत्तीला सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आले होते. एक लाखाहून अधिक प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमवर मोठ्या संख्येने चाहते पोहोचतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या राहिल्या. त्यामुळे सोशल मीडियावरही क्रिकेट चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग असे म्हणणे आहे की, “गुरुवारी अहमदाबादमधील रिकाम्या स्टेडियममध्ये जेव्हा स्पर्धा सुरू होईल तेव्हा विश्वचषक आयोजकांनी भारताव्यतिरिक्त इतर संघांच्या सामन्यांसाठी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत तिकिटे द्यावीत. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम गर्दी खेचण्यात अयशस्वी झाले आणि समर्थनाच्या कमतरतेमुळे अनेक क्रिकेट चाहते सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. या क्षणी एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता कमी होत आहे आणि स्पर्धेदरम्यान तरुणांना अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश मिळाल्याने त्यांची खेळातील आवड वाढू शकते,” असा विश्वास सेहवागला आहे.

सेहवागने काय लिहिले?

भारताचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे की, “लहान मुलांसाठी मोफत तिकिटे असली पाहिजेत. ५० षटकांच्या खेळातील रस कमी होत असल्याने, यामुळे तरुणांना विश्वचषक सामना पाहण्याचा अनुभव मिळेल आणि खेळाडूंना खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याची संधीही मिळेल. आयसीसीने यावर थोडा विचार करायला हवा.” असा अजब सल्ला त्याने दिला.

हेही वाचा: World Cup, ENG vs NZ: रवींद्र- कॉनवेची वादळी शतके! न्यूझीलंडपुढे माजी विश्वाविजेत्यांनी टेकले गुडघे, इंग्लंडचा नऊ विकेट्सने केला दारूण पराभव

न्यूझीलंडचा मोठा विजय

न्यूझीलंड संघाने १३व्या विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात केली आहे. त्यांनी गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने विश्वचषक २०१९च्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. त्यानंतर विजेतेपदाच्या सामन्यात सामना आणि सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडने चौकार मोजण्याच्या नियमानुसार सामना जिंकला.

हेही वाचा: Asian games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद! ज्योती, अदिती आणि प्रनीतची शानदार कामगिरी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (५ ऑक्टोबर) न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ गडी गमावून २८२ धावा केल्या. न्यूझीलंडने ३६.२ षटकात १ विकेट गमावत २८३ धावा करत सामना जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup stadium remained empty in the first match sehwag appealed for free ticket england player raised questions avw