Men’s Cricket World Cup 2023 : वर्ल्डकपचा रणसंग्राम आजपासून सुरू झाला आहे. पुढचा दीड महिना बॅट आणि बॉलमधली ही जुगलबंदी रंगणार आहे. वर्ल्डकपची बितंबातमी लोकसत्ता.कॉमवर तुम्हाला वाचायला मिळेलच. याच्या बरोबरीने मॅचमध्ये नेमकं काय काय घडलं, टर्निंग पॉइंट काय होता, कोण काय बोललं हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ‘गोष्ट वर्ल्डकपची’. मॅच संपली की आपण लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर भेटूया. तुम्ही या क्रिकेट गप्पांच्या मैफलीत सामील व्हा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाने १९८३ मध्ये विश्वविजेतेपदावर कब्जा केला. या विजयाने देशातल्या क्रिकेटप्रेमाला संजीवनी मिळाली. कपिल देवच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या विजयाने असंख्य युवा तरुणांना प्रेरणा मिळाली. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा त्यापैकीच. वर्ल्डकपविजेता होण्याचं स्वप्न सचिनने तेव्हापासून जोपासलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०११ मध्ये मुंबईत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. विजयानंतरच्या जल्लोषात संघातील युवा खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलून घेतलं. सचिनने इतकी वर्ष देशवासियांच्या आशाअपेक्षांचं ओझं वागवलं. त्याने क्रिकेटला दिलेल्या अमूल्य योगदानासाठी आम्ही त्याला उचलून घेतलं असं विराट कोहली म्हणाला होता.

२०११ विश्वचषकानंतर भारताचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. जगभरात सगळीकडे धावांची टांकसाळ उघडणारा विराट कोहलीचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न अद्यापही पूर्ण झालेलं नाही. वय पाहता कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. या पार्श्वभूमीवर या वर्ल्डकपचं मोल अनोखं आहे. या दोघांसह अन्य संघांपैकी केन विल्यमसन, जो रूट, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, टीम साऊदी, शकीब अल हसन यांच्यासाठी हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. त्यामुळे हा वर्ल्डकप अनेक खेळाडूंसाठी भावनिक आहे.

वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही. त्यांच्या गतवैभवाच्या आठवणी जागवत क्रिकेटरसिक १० संघांना पाठिंबा देतील. मैदानावर, मैदानाबाहेर काय काय घडतंय हे आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आणू.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup story everyday world cup 2023 live streaming
Show comments