Mahendra Singh Dhoni, Indian Cricket Team: क्रिकेटचा महाकुंभ म्हटला जाणारा विश्वचषक २०२३ आता फार दूर नाही. विश्वचषकाची काउंटडाऊन सुरू झाले आहे. भारतात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा सुरू होणार आहे. भारताच्या या स्थितीचा फायदा घेत रोहित शर्मा आणि कंपनी विजेतेपद मिळविण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यासाठी टीम इंडियाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या एम.एस. धोनीला BCCI २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत एक नवी मोठी जबाबदारी सोपवू शकते.

एम.एस. धोनीवर २०२३च्या विश्वचषकात मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते

एम.एस. धोनी हा भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील खेळाडू आज संघाला पुढे नेत आहेत. धोनीने आपल्या कारकिर्दीत भारताला तिन्ही फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनवले. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक जिंकला. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत तो अनेक वेळा तिन्ही फॉरमॅट पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता.

Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Dhule City Polarization of votes beneficial to any candidate print politics news
लक्षवेधी लढत: धुळे शहर : मतांचे ध्रुवीकरण कोणाला फायदेशीर?
Sharad Pawar claims that the grand alliance plans are possible but people want change print politics news
महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Jitendra Awhad On Vidhan Sabha Election 2024
Jitendra Awhad : मराठा आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर आरोप
Shreyas Iyer Double Century After 9 year for Mumbai Scores Career Best First Class 233 Runs Innings Mumbai vs Odisha
Shreyas Iyer Double Century: २४ चौकार, ९ षटकार, २३३ धावा… श्रेयस अय्यरने वादळी खेळीसह मोडला स्वत:चाच मोठा विक्रम, IPL लिलावापूर्वी टी-२० अंदाजात केली फटकेबाजी

हेही वाचा: ENG vs AUS: संजय मांजरेकरांच्या मते ‘ही’ आहे इंग्लंडसाठी चिंतेची बाब; ते म्हणाले की, “स्टोक्ससाठी चांगली चिन्हे नाहीत…”

धोनीचे अमूल्य योगदान कधीही विसरता येणार नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआय एम.एस. धोनीच्या अनुभवाचा फायदा या वर्षी खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषक २०२३ मध्ये घेऊ शकते. बीसीसीआय विश्वचषकादरम्यान धोनीला टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये समाविष्ट करून त्याला मार्गदर्शक बनवले जाऊ शकते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी होण्यासाठी खूप मदत मिळू शकते. याआधीही धोनीला २०२१च्या टी२० विश्वचषकात मेंटॉर बनवण्यात आले होते.

बुमराह-अय्यर विश्वचषकात पुनरागमन करू शकतात

वर्ल्डकप २०२०पूर्वी टीम इंडिया अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त आहे. रस्ता अपघातानंतर ऋषभ पंत संघातून बाहेर आहे. दुसरीकडे स्टार फलंदाज के.एल. राहुल आयपीएल २०२३ दरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यांच्याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे गेले एक वर्षापासून संघाचा भाग नाहीत. मात्र, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यरचे फिटनेस अपडेट येत आहे की ते दोघेही विश्वचषकापूर्वी भारतीय संघात पुनरागमन करू शकतात.

हेही वाचा: ODI World Cup 2023: ICC आणि BCCIने मिळून पाकिस्तानच्या मागण्यांना दाखवली केराची टोपली, वर्ल्डकपबाबत आले मोठे अपडेट्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन्ही खेळाडू ऑगस्टमध्ये आयर्लंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेत मैदानावर दिसू शकतात. त्यामुळे त्यांना विश्वचषकाच्या तयारीत मोठी मदत मिळणार आहे. याशिवाय आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित करणारा रिंकू सिंग आणि यशस्वी जैस्वाल यांचा टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात स्टँडबाय म्हणून समावेश केला जाऊ शकतो.