साधारण व्यक्ती वयाच्या साठीमध्ये पोहचली की तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामे करण्यावर मर्यादा येतात. काहींना जास्त अंतराचे चालणेही नाही होत. मात्र, ९४वर्षांच्या भगवानी देवी डागर यांनी या सर्व मर्यादा मोडून काढल्या आहेत. त्यांनी या वयात फिनलंडमध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२’ स्पर्धेमध्ये १०० मीटर स्प्रिंट(वेगात चालणे) प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वजण चकित झाले आहेत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भगवानी देवी यांनी १०० मीटर अंतर २४.७४ सेकंदात पार केले. याशिवाय त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. तिथेही त्यांनी कांस्य पदक मिळविले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे भरपूर कौतुक होत आहे. त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला लोकांनी सलाम केला आहे.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Who Is D Gukesh Indian Grandmaster Who Became Youngest Ever World Chess Champion
Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
Students selected for regional finals said Loksatta Lokankika competition is different from others
लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीला उत्साहात सुरुवात, सहभागी विद्यार्थी म्हणतात…
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचे कौतुक केले आहे. मंत्रालयाने लिहिले, “भारतातील ९४ वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.”

भगवानी देवींचा नातू विकास डागर हा देखील पॅराअ‍ॅथलीट असून त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आता त्याची आजी असलेल्या भगवानी देवींनी पदके जिंकून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.

हेही वाचा – “त्यांना एक्सपर्ट का म्हणतात हेच कळत नाही”; विराटवर टीका करणाऱ्यांचा रोहितनं घेतला समाचार

विशेष म्हणजे चेन्नई येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवला.

Story img Loader