भारतीय संघात स्थान मिळवून ते टिकवण्यात काही कारणांमुळे अपयशी ठरलेला मनोज तिवारी आता आयपीएलच्या माध्यमातून ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघात निवड व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय संघात पुनरागमन करण्याची इच्छा असून येत्या काही दिवसांमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार आहे. विश्वचषकात भारतीय संघात निवड होण्यासाठी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करण्याचा माझा मानस आहे, असे कोलकाता नाइट रायडर्स संघाचा फलंदाज मनोज तिवारीने सांगितले.
‘‘आयपीएलच्या पहिल्या मोसमात विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळाली होती. पण त्यानंतर मात्र हे चित्र बदलले.
आताच्या घडीला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात येते. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून विश्वचषकात संघात स्थान पटकावण्याचे माझे ध्येय आहे,’’ असे तिवारी म्हणाला.
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड व्हावी हेच ध्येय – मनोज
भारतीय संघात स्थान मिळवून ते टिकवण्यात काही कारणांमुळे अपयशी ठरलेला मनोज तिवारी आता आयपीएलच्या माध्यमातून ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघात निवड व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे.
First published on: 06-04-2015 at 12:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World t20 selection will be on our minds manoj tiwary