भारताने आर्यलडचा २-१ असा पराभव करून फ्रान्स येथे झालेल्या डब्ल्यूएसएफ जागतिक महिला सांघिक स्क्वॉश स्पर्धेत पाचवे स्थान प्राप्त केले. जोश्ना चिनप्पा हिने ऐसलिंग ब्लेक हिला नमवून भारताला आघाडीवर आणले. मात्र १३वेळा आर्यलडची राष्ट्रीय विजेती ठरलेल्या मेडलिन पेरी हिने भारताची अव्वल खेळाडू दीपिका पल्लिकल हिला हरवून सामन्यात बरोबरी साधली. मात्र चेन्नईच्या १८ वर्षीय अनाका अलंकामोनी हिने अनुभवी लॉरा मायलोट हिचा सरळ तीन गेममध्ये पराभव करून भारताला विजय मिळवून दिला. इजिप्तने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करून जेतेपद पटकावले.

Story img Loader