ICC World Test Championship 2023-25 Final Match: बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना पाकिस्तानने गमावल्यानंतर सर्वच स्तरावरून पाकिस्तान संघाला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. बांगलादेशने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानी क्रिकेट संघाचा १० विकेट्सने पराभव केला. बांगलादेशविरूद्धच्या या पराभवानंतर पाकिस्तान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाला का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. भारतीय संघ पहिल्या स्थानी असून अजूनही पाकिस्तानला भारताविरूद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरण्याची संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पाकिस्तान संघातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर, शाहीन आफ्रिदी रागाने शान मसूदचा हात झटकतानाचा VIDEO व्हायरल

बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानी संघ २०२३-२५ च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ८व्या स्थानावर असून ३०.५६ टक्के गुण आहेत. संघाने आतापर्यंत खेळलेले ६ पैकी २ सामने जिंकले आहेत, तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता संघाला आणखी ८ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे पाकिस्तान संघाला अजूनही WTC ची अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. पण हे सर्व सामने सोपे असणार नाही. पाकिस्तानला इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरूद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. त्यापैकी इंग्लंड, वेस्ट इंडिजचे सामने पाकिस्तानात खेळवले जातील तर आफ्रिकेविरूद्धचा सामना पाकिस्तानला प्रतिस्पर्धी संघाच्या मायदेशात जाऊन खेळायचा आहे. हे सर्व सामने जिंकणंच शक्य नसलं तरी पाकिस्तानला अंतिम सामन्यात स्थान मिळवायचे असेल तर संघाचा चोख कामगिरी करावी लागणार आहे.

हेही वाचा – VIDEO: रागाच्या भरात कार्लाेस ब्रेथवेटने बॅटने हेल्मेटला चेंडूप्रमाणे उडवलं, हेल्मेट थेट सीमारेषेबाहेर

तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जागतिक कसोटी अजिंक्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. हे दोन्ही संघ सध्याच्या घडीला गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहेत. भारत नऊ सामन्यात सहा विजयांसह व ६८.५२ टक्क्यांसह पहिल्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया १२ सामन्यात ८ विजयांसह व ६२.५० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही दोन्ही देशांसाठी महत्त्वाची असणार आहे. ज्यामध्ये दोन्ही संघ ५ कसोटी सामने खेळणार आहे.

हेही वाचा – WI vs SA: पुन्हा जिंकता जिंकता हरली दक्षिण आफ्रिका, अखेरच्या ५ षटकांत वेस्ट इंडिजने पालटला सामना, २० धावांत ७ विकेट…

पाकिस्तानवरील बांगलादेशच्या विजयाने संघ आता सहाव्या स्थानी पोहोचला आहे. पाच सामन्यांतील दोन विजयांसह व ४०.०० टक्के गुण बांगलादेशने मिळवले आहेत. तर श्रीलंका वि इंग्लंड कसोटी सामन्यात इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत झेप घेतली आहे. या विजयासह न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानी आला तर श्रीलंकाने एका स्थानाने घसरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World test championship 2025 how pakistan qualify for final match ind vs pak know equation bdg
Show comments