जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२३ च्या प्लेऑफमध्ये खेळणे कठीण होऊ शकते.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (WTC) फायनल ७ ते ११ जून दरम्यान ओव्हल येथे होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, आयपीएल २०२३ दोन महिन्यांहून अधिक काळ चालेल आणि अंतिम सामना मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो. या स्थितीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि आयपीएल प्लेऑफ यांच्यात टक्कर होऊ शकते. त्याच्या तारखा या एकमेकांत अडकलेल्या दिसत आहेत.
टी२० आणि मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये सध्या इंग्लंड क्रिकेट संघाचा दबदबा सुरू आहे. सध्या या संघाकडे दोन्ही फॉरमॅटचे विश्वचषक विजेतेपद आहे. कसोटी विश्वचषक म्हणजे कसोटी चॅम्पियनशिपमध्ये त्यांचा अजूनही संघ मागे असून अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची फारशी आशा नाही. इंग्लंडने नुकत्याच रावळपिंडीत पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी विजयानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा वाढल्या आहेत. हे असे घडले आणि यावर जर विश्वास ठेवला तर पुढील वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचे आयोजन केले जाऊ शकते.
भारताच्या टी२० टूर्नामेंट इंडियन प्रीमियर लीगमुळे, त्याच्या संघटनेत बदल शक्य आहे. आयपीएल ४ जून किंवा २८ मे पर्यंत खेळता येईल. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता हा सामना इतका जवळ ठेवणे कठीण जाईल. नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेच्या सात दिवस आधी इतर कोणत्याही टूर्नामेंटचे आयोजन केले जाऊ शकत नाही. जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ७ ते ११ जून दरम्यान आयोजित केली गेली तर बीसीसीआयला आयपीएल २०२३ ची फायनल ३० मे किंवा त्यापूर्वी आयोजित करावी लागेल. एवढेच नाही तर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली तर आयपीएलमुळे भारतीय खेळाडूंना आयसीसी स्पर्धेच्या तयारीसाठी फारच कमी वेळ मिळेल. कारण त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता कमी झालेली असेल आणि विश्रांतीसाठी त्यांना वेळच मिळणार नाही.