पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदानंतर या प्रकारात सूर हरवलेल्या भारतीय संघाला एका नव्या उमदीने यंदाच्या विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे. न्यूझीलंड दौऱ्यातले अपयश, आशिया चषकात साखळी गटात झालेला पराभव यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. दुखापतीतून सावरलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्याद्वारे आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. संघाची रचना ठरवण्यासाठी धोनीला ही सर्वोत्तम संधी आहे. या सामन्यात सर्वच्या सर्व पंधरा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. २१ तारखेला भारताचा सलामीचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्या लढतीपूर्वी संघ बांधणीचे उद्दिष्ट धोनी आणि फ्लेचर यांच्यासमोर असणार आहे. भारताच्या गटात पात्रता फेरीतील संघासह पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया असे दमदार संघ असल्यामुळे कुठलाही सामना कमी लेखून चालणार नाही.
शिखर धवन-रोहित शर्मा जोडीपैकी रोहित शर्माला खेळपट्टीवर स्थिरावून खेळण्याची गरज आहे. विराट कोहली भारताचा हुकुमी एक्का आहे. महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि सुरेश रैना हे त्रिकुट परतल्याने भारताची मधली फळी मजबूत झाली आहे. युवराज आणि रैनाला आपल्या कच्च्या दुव्यांवर मात करून शानदार पुनरागमनासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणेला मातब्बरांच्या भाऊगर्दीत आपले कौशल्य सिद्ध करावे लागेल. रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा या फिरकी त्रिकुटावर भारताची मोठी भिस्त आहे. स्टुअर्ट बिन्नीला आपला अष्टपैलू खेळ मांडण्याची संधी आहे. वेगवान गोलंदाजीने भारताला वारंवार दगा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा