भारताची आघाडीची महिली बॉक्सर मेरी कोमने जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने भारतासाठी एक पदक निश्चीत केलं आहे. या कामगिरीसह मेरी कोमचं जागतिक अजिंक्यद स्पर्धेतलं आठवं पदक निश्चीत झालं आहे. मेरी कोमने रशियाच्या Ulan-Ude भागात सुरु असलेल्या स्पर्धेत वेलेन्सिया व्हिक्टोरियावर ५-० ने मात केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमच्या नावावर सहा सुवर्णपदकं आणि एक रौप्यपदक जमा आहे. या कामगिरीसह मेरी कोम जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू ठरली आहे.

Story img Loader