बेलग्रेड : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्व १२ वजनी गटांत पदक मिळवणाऱ्या भारतीय कुस्तीगीरांच्या कामगिरीला जागतिक स्पर्धेत मात्र उतरती कळा लागली. ऑलिम्पिक पदकविजेती आणि राष्ट्रकुल विजेती विनेश फोगटला पात्रता फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. भारतीयांसाठी हे सर्वात मोठे अपयश ठरले.

स्पर्धेतील ५३ किलो वजनी गटात विनेश मंगोलियाच्या खुलन बटखुयागकडून पराभूत झाली. आक्रमक आणि वेगवान कुस्ती करत खुलनने विनेशला संधीच दिली नाही आणि गुणांवर ७-० अशी बाजी मारली. खुलनने पुढे उपांत्य फेरी गाठली असून, तिच्या विजयावर आता विनेशच्या आशा अवलंबून असतील. स्पर्धेपूर्वी पात्रता फेरीत विनेशने अंतिमचे आव्हान मोडून जागतिक स्पर्धेत स्थान मिळविले होते. एक महिन्यापूर्वी अंतिमने २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत खुलनवर मात केली होती.

दंगल गर्ल : विनेश फोगट

स्पर्धेतील ५० किलो वजनी गटात नीलमचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. सुषमा शोकिनला ५५ किलो वजनी गटात संधी होती. मात्र, रेपिचेज गटात सुषमाला मालदीवच्या मरिना ड्रॅगुटनविरुद्ध आपली ८-६ आघाडी टिकवता आली नाही. लढतीच्या अखेरच्या टप्प्यात मरिनाने सुषमाला चितपट केले. शेफाली (६५ किलो) आणि प्रियांका (७६ किलो) यांनाही लढतीच्या सुरुवातीच्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात, त्यांच्या प्रतिस्पर्धीनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे दोघींना अजून संधीची आशा आहे.

“७२ तासांत…”, विनेश फोगाटच्या आरोपानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश

पुरुषांच्या ग्रीको-रोमन प्रकारात भारतीय कुस्तीगीर अपयशी ठरले. एकाही मल्लाला पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवता आले नाही.