ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध गोलंदाज शेन वॉर्नचा काही महिन्यांपूर्वी अचानक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबद्दल अनेक दावे करण्यात आले. शिवाय, त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा ऑस्ट्रेलियातील ‘ओन्ली फॅन्स’ सेलिब्रिटी जीना स्टीवर्टने केलेल्या खुलाश्यामुळे वॉर्नचे खासगी आयुष्य चर्चेत आले आहे.

यावर्षी मार्च महिन्यात थायलंडमध्ये सुट्टीसाठी गेलेल्या शेन वॉर्नचा अचानक मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का बसला होता. आता त्याच्या मृत्यूला सहा महिने झाल्यानंतर जीनाने दोघांच्या नातेसंबधाबाबत खुलासा केला आहे. सोशल मीडियावर स्वत:चे ‘वर्ल्ड्स हॉटेस्ट ग्रँडमा’, असे नाव लावणाऱ्या जीना स्टीवर्टने क्रिकेटपटू शेन वॉर्नसोबत आपले संबंध होते, असा दावा केला आहे. मृत्यूपूर्वी थायलंडला जाण्याअगोदर वॉर्न तिच्या नियमित संपर्कात होता, असेही ती म्हणाली आहे.

हेही वाचा – “मी सचिनकडून अपेक्षा ठेवणं…”; विनोद कांबळी करतोय आर्थिक संकटाचा सामना

जीनाने डेली स्टारला सांगितले, “गेल्या काही महिन्यांपासून मी उद्विग्न झाले आहे. जगाने एक दिग्गज खेळाडू गमावला आणि मी एक विश्वासू मित्र गमावला. मी आणि शेन एकमेकांना डेट करत होतो पण याबाबत कुणाला माहिती नव्हती. त्याला आमचे नाते गुपीत ठेवायचे होते. २०१८मध्ये आमची भेट झाल्यानंतर आम्ही सतत संपर्कात होतो. गोल्ड कोस्ट येथे आम्ही सर्वांच्या नजरा चुकवून भेटलो होतो.”

जीना स्टीवर्टने दोघांच्या गोल्ड कोस्ट येथील भेटीचे तपशीलही उघड केले आहेत. “तो गोल्ड कोस्टला आला होता. तिथे क्रिकेट सामन्यानंतर मी त्याला भेटले. आम्ही संपूर्ण रात्र एकमेकांना जाणून घेण्यात घालवली. मला तो अत्यंत चांगला वाटला. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. मात्र, हे नाते लोकांपासून लपवून ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता”, असे स्टीवर्ट पुढे म्हणाली.

Story img Loader