आपल्या दमदार खेळीच्या बळावर क्रिकेटविश्वात आपले वर्चस्व गाजवणाऱ्या विराट कोहलीला नवी मुंबईकरांनी वाढदिवसाचे खास गिफ्ट दिले आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीचा ५ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असतो. यावर्षी ५ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सणाला सुरूवात होत आहे. याचेच औचित्य साधत नवी मुंबईतील सी-वूड ग्रँन्ड सेंट्रल मॉलमध्ये विराट कोहलीची रंगीत दिव्यापासून कलाकृती तयार केली आहे. आबासाहेब शेळके या कलाकराने रंगीत दिव्याच्या साह्याने विराट कोहलीची ही कलाकृती तयार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आबासाहेब शेळके यांनी यासाठी ५,२४४ मातीच्या दिव्यांचा वापर केला आहे. दिव्यापासून तयार करण्यात आलेली ही जगातील सर्वात मोठी कलाकृती असल्याचा दावा करण्यात येत आहे. दहा फूट लांब आणि १६ फूट उंच इतक्या आकाराची ही कलाकृती आहे. आबासाहेब शेळकेंनी या कलाकृतीसाठी आबासाहेब यांनी सहा विविध रंगाच्या दिव्यांचा वापर केला आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहली ५ नोव्हेंबर २०१८ रोजी ३० व्या वर्षात पदार्पण करेल. नुकतेच विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. विराट कोहलीने वेगाने दहा हजार धावा पूर्ण करण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी हा वाढदिवस खास आहे. कारण, लग्नानंतर विराट कोहलीचा पहिलाच वाढदिवस आणि दिवाळी असणार आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने २१५ एकदिवसीय सामन्यातील २०७ डावांत १०,१९९ धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीने ३८ शतके आणि ४८ अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये विराट कोहलीच्या नावावर ६३३१ धावांची नोंद आहे. यादरम्यान विराट कोहलीने २४ शतके झळकावली आहेत. विराट कोहलीच्या नावावर आता एकूण ६२ शतकांची नोंद आहे.