WPL 2023 3rd Match UP Warriorz vs Gujarat Giants: डब्ल्यूपीएल २०२३ मधील तिसरा सामना यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात खेळला जात आहे. हा सामना डॉ.डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६९ धावा केल्या. त्याचबरोबर यूपी वॉरियर्स संघासमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले.
गुजरात जायंट्सकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तिने ३२ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने धावा केल्या. त्यामुळे गुजरात संघाला १५० धावांचा टप्पा पार करता आला. त्यानंतर हेमलता आणि स्नेह राणाने अनुक्रमे नाबाद २१ आणि ९ धावा केल्या. त्यामुळे गुजरात संघाला ६ बाद १६९ धावा करता आल्या.
गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात जायंट्ससाठी सबभीनेनी मेघना आणि सोफिया डंकले या सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ३४ धावांचे योगदान दिले. ज्यानंतर सोफिया डंकले ११ चेंडूत १३ धावा काढून बाद झाली. तिला दीप्ती शर्माने बोल्ड केले. त्यानंतर सबभीनेनी मेघना २४ (१५), सुष्मा वर्मा ९(१३), अॅनाबेल सदरलँड ८(१०) आणि ऍशलेघ गार्डनर २५(१९) धावांचे योगदान दिले.
यूपी वॉरियर्सकडून गोलंदाजी करताना सोफी एक्लेस्टोन दीप्ती शर्माने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अंजली आणि ताहिला यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यूपी वॉरियर्सक संघाला आपला पहिला विजय मिळवण्यासाठी १७० धावा करायच्या आहेत.
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): सभिनेनी मेघना, सोफिया डंकले, सुषमा वर्मा , अॅशलेग गार्डनर, दयालन हेमलता, अॅनाबेल सदरलँड, हरलीन देओल, स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (कर्णधार), श्वेता सेहरावत, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, किरण नवगिरे, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड