UP Warriorz Women vs Delhi Capitals Women Match Updates: पहिल्यांदा खेळल्या जात असलेल्या महिला प्रीमिअर लीगच्या हंगामातील पाचवा सामना यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान खेळला गेला त्यात. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्सवर ४२ धावांनी शानदार विजय मिळवत ग्रुपमधील पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवले आहे. आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या या दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र दिल्लीने दमदार प्रदर्शन करत यूपीला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही. ताहिला मॅकग्राने काही काळासाठी यूपीच्या आशा पल्लवित केल्या होत्या मात्र तिची झुंज एकाकी ठरली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जेस जॉन्सनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दिल्लीने ठेवलेल्या २१२ धावांचे ठेवलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात खराब झाली. कर्णधार एलिसा हिली आणि सलामीवीर श्वेता सेहरावत यांच्यात पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी झाली. कर्णधार एलिसा हिली १७ चेंडूत २४ धावा काढूनबाद झाली. मागच्या सामन्यात अर्धशतक करणारी किरण नवगिरे चांगली खेळी करू शकली नाही ती केवळ २ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या ताहिला मॅकग्रा आणि दीप्ती शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अष्टपैलू दीप्ती शर्माने संथ फलंदाजी करत संघाला अडचणीत आणले, तिने २० चेंडूत १२ धावा करत राधा यादवकरवी झेलबाद झाली.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pratika Rawal World Record She Scored 444 Runs in Just 6 Matches After International Debut in Womens ODI
INDW vs IREW: प्रतिका रावलचा वर्ल्ड रेकॉर्ड, आजवर कोणत्याच महिला फलंदाजाला जमली नाही अशी कामगिरी
India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

देविका वैद्यने ताहिला मॅकग्राची साथ देत २३ धावा केल्या पण ती आक्रमक फटका मारण्याच्या नादात बाद झाली. ताहिला मॅकग्राने सर्वोत्तम फिनिशरची भूमिका निभावली. तिने ५० चेंडूत ९० धावांची एकाकी झुंज दिली जी अपयशी ठरली. अवघ्या १० धावांनी तिचे शतक हुकले. तिने या खेळीला ११ चौकार आणि ४ षटकारांचा साज चढवला. या सामन्यात युपी संघाने पहिल्या सामन्यातील विजयाची शिल्पकार ठरलेल्या ग्रेस हॅरिस हिला बाकावर बसवले. त्यामुळे यूपीला पराभवाचा सामना करावा लागला यावर सोशल मीडियात अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

दिल्लीकडून जेस जॉन्सनने अष्टपैलू कामगिरी करत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. शिखा पांडे आणि मारिजाने कॅप यांनी प्रत्येकी एक विकेट घेत तिला साथ दिली. क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट नमुना प्रस्थापित करणारी राधा यादवने ३ झेल घेतले. तर अनेक ठिकाणी तिने उत्तम क्षेत्ररक्षण करत संघासाठी धावा वाचवल्या. कर्णधार मेग लॅनिंगनंतर जेस जॉन्सन आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या शानदार फलंदाजीमुळे दिल्लीने यूपीसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करणे यूपीसाठी सोपे नव्हते.

हेही वाचा: KL Rahul: “…फलंदाजांना फार काही स्कोप नसतो” IPL २०२३ सुरु होण्यापूर्वी लोकेश राहुलचे मोठे विधान

पहिल्या डावात काय घडले?

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत दिल्ली संघाने सुरुवातीला संथ फलंदाजी केली, परंतु नंतर शेफाली वर्मा आणि कर्णधार लॅनिंग यांनी आपले गियर बदलले. दोघांनी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेत मोठे फटके खेळले. त्यामुळे दिल्लीने पहिल्या सहा षटकांतच ६२ धावा जोडल्या होत्या. यानंतर शेफाली वर्मा १४ चेंडूत १७ धावा करून बाद झाली, पण दुसऱ्या टोकाला लॅनिंग मैदानातच राहिला. त्याने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

हेही वाचा: WPL 2023, UP-W vs DC-W: मॅचविनर हॅरिसला बाकावर‌ बसवणे पडणार का महागात? दिल्लीने यूपीसमोर ठेवले २१२ धावांचे लक्ष्य

दिल्लीने नऊ षटकांत ८७ धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे सामना थांबला, पण लॅनिंगची आक्रमक फलंदाजी सुरूच होती. दरम्यान, १२ चेंडूत १६ धावा करून मारिजेन कॅपही बाद झाली. पुढच्याच षटकात ४२ चेंडूत ७० धावा करून कर्णधार लॅनिंगही तंबूत परतला आणि युपीचा संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते. मात्र, अ‍ॅलिस कॅप्सीने हे होऊ दिले नाही. तिने १० चेंडूत २१ धावांची तुफानी खेळी करत दिल्लीला सामन्यात परत आणले.

Story img Loader