WPL 2023 RCB-W vs UP-W 12th Match: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा १३वा सामना खेळला गेला. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपी वॉरियर्सचा संघ १९.३ षटकात १३५ धावांवर गारद झाला. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने पहिला विजय मिळवत गुणतालिकेत खाते उघडले आहे. यूपी वॉरिअर्सवर पाच विकेट्सने मात केली.
महिला प्रीमियर लीगच्या १३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यूपी वॉरियर्सचा पाच गडी राखून पराभव केला. मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये सामना रंगला. आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपी वॉरियर्सचा संघ १९.३ षटकात १३५ धावांवर गारद झाला. आरसीबीने १८ षटकात ५ विकेट्स गमावत १३६धावा करत सामना जिंकला. त्याचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ला सहाव्या सामन्यात महिला प्रीमियर लीगमध्ये ज्या विजयाची अपेक्षा होती ती मिळाली. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील या संघाने यूपी वॉरियर्सचा पाच गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. यापूर्वी ते मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स (दोनदा), गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्सकडून पराभूत झाले होते.
कनिका आणि रिचा ठरल्या विजयाच्या मानकरी
२० वर्षांची कनिका आहुजा आणि १९ वर्षांची रिचा घोष यांनी आरसीबीसाठी यांनी मोलाचे योगदान दिले. कनिकाने ३० चेंडूत ४६ धावा केल्या. त्याचवेळी रिचाने ३२ चेंडूत ३१ धावा करून ती नाबाद राहिली. अनुभवी हीदर नाइटने २४ धावांचे योगदान दिले. सोफी डेव्हाईनने १४ आणि अॅलिस पॅरीने १० धावा केल्या. कर्णधार स्मृती मानधना पुन्हा एकदा अपयशी ठरली. ती खाते न उघडताच बाहेर पडली. श्रेयांका पाटीलने नाबाद पाच धावा केल्या. यूपी वॉरियर्सकडून दीप्ती शर्माने दोन बळी घेतले. सोफी एक्लेस्टोन, देविका वैद्य आणि ग्रेस हॅरिस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
तत्पूर्वी आरसीबीने यूपी वॉरियर्सला १९.३ षटकांत १३५ धावांत गुंडाळले. यूपीकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक ४६ धावा केल्या. दीप्ती शर्मा आणि किरण नवगिरे यांनी २२-२२ धावा केल्या. सोफी एक्लेस्टोनने १२ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू अॅलिस पॅरीने या सामन्यात आरसीबीसाठी सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. सोफी डिव्हाईन आणि आशा शोबाना यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. मेगन शुट आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.