MI-W vs UPW-W, WPL 2023 Eliminator Match Score Highlights updates: महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. या विजयासह त्याने अंतिम फेरीत धडक मारली. आता २६ मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने २० षटकांत ४ बाद १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ १७.४ षटकांत ११० धावांवर गारद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो अपयशी ठरताना दिसला. प्रथम फलंदाजीला आमंत्रित करत मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्ससमोर १८३ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे. जर यूपीला अंतिम फेरी गाठायची असेल तर हे आव्हान कसे पार करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मुंबईकडून नॅटली सिव्हर-ब्रंटने शानदार खेळी केली. त्याने ३८ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या. यादरम्यान तिने नऊ चौकार आणि दोन षटकारांचा साज चढवला. नॅटली सिव्हर-ब्रंट आणि अमेलिया केर या दोघींनी हरमन बाद झाल्यानंतर अर्धशतकी भागीदारी झाली. ६० धावांची भागीदारी मोडण्यात यूपीला यश आले. अमेलियाने १९ चेंडूत २९ धावा केल्या. तिला सोफी एक्लेस्टोनने झेलबाद केले. त्यानंतर आलेली पूजा वस्त्रकार आणि ब्रंट यांनी मोठे फटके मारत आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

तत्पूर्वी, सलामीवीर हीली मॅथ्यूजने २६ चेंडूत २६ आणि यास्तिका भाटियाने १८ चेंडूत २१ धावा केल्या. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने १५ चेंडूत १४ धावा केल्या. पूजा वस्त्राकरने चार चेंडूत ११ धावा केल्यानंतर नाबाद राहिली. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक दोन विकेट्स घेतले. अंजली सरवानी आणि पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी एक विकेट घेत तिला मदत केली.

WPL नियमांनुसार, साखळी टप्प्यात गुणतालिकेत शीर्षस्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असणारे संघ एलिमिनेटर सामना खेळत आहेत. हा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबई आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील एलिमिनेटरचा विजेता रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

Live Updates

WPL 2023, MI-W vs UPW-W Eliminator Match Highlights Score: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्स महिला हायलाइट्स

22:45 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: मुंबईने यूपी वॉरियर्सची ७२ धावांनी उडवली दाणादाण

सायका इसाकने राजेश्वरी गायकवाडला ५ धावांवर बाद करताच मुंबईने यूपीवर तब्बल ७२ धावांनी विजय नोंदवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

यूपी वॉरियर्स ११०-१०

22:38 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: यूपीला नववा धक्का, अंजली सरवानी बाद

जिंतिमनी कलिताने वाहत्या गंगेत हात धूत एक विकेट काढली. अंजली सरवानीला अवघ्या ५ धावांवर बाद करत यूपीला नववा धक्का दिला.

यूपी वॉरियर्स १०४-९

22:24 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: यूपीला आठवा धक्का, दीप्ती बाद

यूपीला आठवा धक्का बसला असून दीप्ती शर्मा १६ धावा करून बाद झाली. तिला हिली मॅथ्यूजने झेलबाद केले. मुंबईच्या विजयाची केवळ औपचारिकता उरली आहे.

यूपी वॉरियर्स ९४-८

22:21 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: WPLची पहिली हॅटट्रिक यूपीला इस्सी वोंगने दिले एकापाठोपाठ धक्के

यूपीला इस्सी वोंगने एकाच षटकात हॅटट्रिक घेत सामन्यात एक वेगळीच रंजक आणली. ही पहिली WPLची पहिली हॅटट्रिक ठरली. तिने पाय रोवून उभ्या असलेल्या किरण नवगिरेला झेलबाद केले. तिने २७ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यापाठोपाठ वोंगने सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टोनला भोपळाही न फोडता माघारी पाठवले. दोघी त्रिफळाचीत झाल्या.

यूपी वॉरियर्स ८४-७

22:11 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: अंतिम फेरीत पोहचण्यासाठी ४८ चेंडूत ९९ धावांची गरज

यूपी वॉरियर्सचा अर्धा डाव संपला आहे. त्याने १० षटकांत ४ गडी गमावून ६३ धावा केल्या आहेत. त्याला विजयासाठी उर्वरित १० षटकांत १२० धावा करायच्या आहेत. किरण नवगिरे २५ चेंडूत ४३ आणि दीप्ती शर्मा १५ चेंडूत ८ धावा खेळत आहे.

यूपी वॉरियर्स ८४-४

21:54 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: यूपी वॉरियर्सला चौथा धक्का, ग्रेस हॅरिस बाद

पहिले तीन विकेट्स लवकर पडल्यानंतर ग्रेस हॅरिस आणि किरण नवगिरे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात ग्रेस बाद झाली. तिने १४ धावा करत नॅटली सिव्हर-ब्रंटकरवी झेलबाद केले.

यूपी वॉरियर्स ५६-४

21:38 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: यूपीला तिसरा धक्का, ताहलिया मॅकग्रा धावबाद

अमनजोत कौरच्या शानदार थ्रोने ताहलिया मॅकग्राला तंबूचा रस्ता दाखवला. तिने ६ चेंडूत ७ धावा केल्या. पॉवर-प्ले मध्ये यूपीची सुरुवात खराब झाली असून सध्या त्यांना मोठ्या भागीदारीची गरज आहे.

यूपी वॉरियर्स २१-३

21:29 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: १८३ धावांचा पाठलाग करताना यूपीची खराब सुरुवात, सलामीवीर तंबूत

१८३ धावांचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात खराब झाली असून दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. श्वेता सेहरावतला सायका इशाकने झेलबाद केले. तिचे षटक विकेट मेडन ठरले. त्यापाठोपाठ कर्णधार अ‍ॅलिसा हिली देखील केवळ ११ धावा करून बाद झाली. तिला इस्सी वोंगने झेलबाद केले.

यूपी वॉरियर्स १२-२

21:02 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: मुंबईला चौथा धक्का, अमेलिया केर बाद

नॅटली सिव्हर-ब्रंट आणि अमेलिया केर या दोघींनी हरमन बाद झाल्यानंतर अर्धशतकी भागीदारी झाली. ६० धावांची भागीदारी मोडण्यात यूपीला यश आले. अमेलियाने १९ चेंडूत २९ धावा केल्या. तिला सोफी एक्लेस्टोनने झेलबाद केले. त्यानंतर आलेली पूजा वस्त्रकार आणि ब्रंट यांनी मोठे फटके मारत आव्हानात्मक उभी केली. यूपीसमोर विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

मुंबई इंडियन्स १८२-४

20:45 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: नॅटली सिव्हर-ब्रंटचे अप्रतिम अर्धशतकी खेळी

नॅटली सिव्हर-ब्रंटने अफलातून अर्धशतक झळकावत संघाला मोठ्या धावसंख्या करण्यासाठी आपले योगदान देत आहे. सध्या ती २७ चेंडूत ५१ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे. तिने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ही खेळी केली.

मुंबई इंडियन्स १२८-३

20:31 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: मुंबईला मोठा धक्का, हरमनप्रीत कौर बाद

मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर बाद झाली असून तिने १५ चेंडूत १४ धावा केल्या. सोफी एक्लेस्टोनने तिला त्रिफळाचीत केले.

मुंबई इंडियन्स १०४-३

20:24 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: मुंबईच्या निम्मी षटके संपली

यूपी वॉरियर्सविरुद्ध मुंबईची अर्धी षटके संपली आहेत. त्याने १० षटकात २ विकेट्सवर ७८ धावा केल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत नताली सायव्हर ब्रंट क्रीझवर आहे. संघाला दुसरा धक्का हिली मॅथ्यूजच्या रूपाने बसला. १०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॅथ्यूजला पार्श्वी चोप्राने बाद केले. किरण नवगिरेने त्याचा झेल घेतला. मॅथ्यूजने २६ चेंडूत २६ धावा केल्या.

मुंबई इंडियन्स ९६-२

20:18 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: मुंबईला दुसरा धक्का, हिली मॅथ्यूज बाद

चांगल्या सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का बसला आहे. हिली मॅथ्यूज २६ धावांवर बाद झाली. तिला पार्श्वी चोप्राने झेलबाद केले.

मुंबई इंडियन्स ६९-२

20:11 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: हिली मॅथ्यूज बाद की नाबाद? जाणून घ्या

दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर अंजली सरवानी जबरदस्त झेल घेतला मात्र तिचे बोटे जमिनीला टेकलेली असल्याने तो अवैध ठरविण्यात आला. चेंडू जमिनीला लागला होता असे तिसऱ्या अंपायरचे मत होते. यावरून आता कॉमेंट्रीमध्ये अनेक मतमतांतरे निर्माण झाली आहे. अंजुम चोप्राच्या मते ती बाद होती.

मुंबई इंडियन्स ६८-१

19:57 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: पहिल्या पॉवर प्ले नंतर मुंबईची चांगली सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले नंतर मुंबईची चांगली सुरुवात झाली आहे. पाचव्या षटकात यूपी वॉरियर्सला पहिले यश मिळाले. अंजली सरवणीने यस्तिका भाटियाला किरण नवगिरेकडे झेलबाद केले. यास्तिकाने १८ चेंडूत २१ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत चार चौकार मारले. यास्तिका बाद झाल्यानंतर नताली स्कायव्हर ब्रंट खेळपट्टीवर आली आहे.

मुंबई इंडियन्स ५४-१

19:49 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: मुंबईला पहिला धक्का, यास्तिका भाटिया बाद

धमाकेदार सुरुवातीनंतर मुंबईला पहिला धक्का बसला आहे. यास्तिका भाटिया १८ चेंडूत २१ धावा करून बाद झाली. तिला अंजली सरवानीने किरण नवगिरेकरवी झेलबाद केले.

मुंबई इंडियन्स- ३१-१

19:27 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: दोन्ही संघाची प्लेईंग-११

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

मुंबई इंडियन्स: हिली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅटली सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.

यूपी वॉरियर्स: अ‍ॅलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, पार्श्वी चोप्रा, एस यशश्री.

19:05 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

महिला प्रीमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. यूपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबईचा संघ दुसऱ्या तर यूपी वॉरियर्सचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत २६ मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सशी खेळेल.

18:46 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: काय रंग दाखवणार आजची खेळपट्टी? जाणून घ्या

पीच रिपोर्ट-

डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील प्लेऑफ सामना रंगणार आहे. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. दुसऱ्या डावात फिरकीपटू प्रभावी ठरतात. येथे १६५ धावांची धावसंख्या आव्हानात्मक असेल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल. दवाचा किती परिणाम होईल यावर दोन्ही संघांचे कर्णधार निर्णय घेतील.

हवामान अहवाल-

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. सामन्यादरम्यान काही ढग असतील पण बहुतेक आकाश निरभ्र असेल. ४० षटकांचा कोटा असलेला सामना कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल.

18:40 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: असे असतील दोन्ही संभाव्य संघ

दोन्ही संघांपैकी ११ खेळण्याची शक्यता आहे

मुंबई इंडियन्स – हीली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.

यूपी वॉरियर्स – श्वेता सेहरावत/देविका वैद्य, अ‍ॅलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), किरण नवगिरे, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, सिमरन शेख, पार्श्वी चोप्रा, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.

18:15 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: यूपी वॉरियर्सचा wpl मधील चढउताराचा प्रवास

यूपी वॉरियर्सने ८ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय संपादन केला असून गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं आहे. पहिल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यात यूपीने विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यात यूपीने विजयाची माळ गळ्यात घातल्याने त्यांना प्ले ऑफ मध्ये प्रवेश करता आला. मात्र, शेवटच्या सामन्यात यपीने दिलेलं १३८ धावांचं लक्ष्य दिल्लीने १७.५ षटक आणि पाच विकेटस् राखून पूर्ण केलं. त्यामुळं यूपीचा या सामन्यात दिल्लीने पराभव केला होता.

18:13 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: मुंबई इंडियन्सचा wpl मधील आतापर्यंतचा प्रवास

आठ सामन्यांपैकी सहा सामन्यांममध्ये मुंबई इंडियन्से विजयी पताका फडकावली आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सच्या तुलनेनं मुंबईचा नेट रनरेट कमी असल्यामुळं त्यांना अंतिम सामन्यात जागा पक्की करता आली नाहीय. मुंबई पाच सामने जिंकून प्ले-ऑफ मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे. पण मुंबईचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्याने गुणतालिकेत दिल्लीने अव्वल स्थान गाठलं आहे. मागील सामन्यात मुंबई आरसीबीचा ४ विकेट्स राखून पराभव केला होता. आज हरमनब्रिगेड काय कमाल करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

18:11 (IST) 24 Mar 2023
MI-W vs UPW-W: एलिमिनीटर सामन्यासाठी मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स सज्ज

महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत असून आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात महत्वाचा एलिमिनेटर सामना होणार आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये हा मुकाबला रंगणार आहे. तसेच यूपी वॉरियर्सने ८ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय संपादन केला असून गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं आहे. पहिल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यात यूपीने विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यात यूपीने विजयाची माळ गळ्यात घातल्याने त्यांना प्ले ऑफ मध्ये प्रवेश करता आला. त्यामुळे आज जो संघ विजयी होईल तो रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.

महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेतील एलिमिनीटर सामना मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ महिला संघात खेळला गेला मुंबई इंडियन्सच्या इस्सी वोंगच्या भेदक हॅटट्रिकने यूपी वॉरिअर्सवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्याच बरोबर मुंबईने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. या सामन्यात मुंबईची वेगवान गोलंदाज इस्सी वोंग हिने इतिहास रचला.