आज महिला प्रीमियर लीगच्या १२व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात जायंट्सशी संपन्न झाला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. हरमनप्रीतची अर्धशतकी खेळी अन् मुंबईच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने सलग पाचवा विजय नोंदवला आहे. गुजरातवर ५५ धावांनी मात केली. मुंबईने आपले पाचही सामने जिंकत अव्वल स्थान कायम राखले असून त्यांचे पाच सामन्यांत दहा गुण झाले आहेत. त्याचबरोबर गुजरातचा संघ पाचपैकी एक सामना जिंकून चौथ्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी गुजरातला विजय आवश्यक होता मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली. आता सर्व सामने जिंकणे आवश्यक आहेत.

नाणेफेकीचा कौल हा पुन्हा एकदा हरमनच्या विरोधात गेला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १६२ धावा केल्या. मात्र गुजरातला या आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले नाही. शून्यावर गुजरातने त्यांची पहिली विकेट गमावली. या आधीच्या सामन्यात अर्धशतकी खेळणारी सोफिया डंकले अपयशी ठरली. त्यानंतर एस. मेघना आणि हरलीन देओल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मेघना १६ धावा करून बाद झाली आणि त्यानंतर गुजरात संघाला गळती लागली. एकाच षटकात मेघना सोबत अ‍ॅनाबेल सदरलँड भोपळाही न फोडता बाद झाली. ऍशले गार्डनर देखील फार काही करू शकली नाही. ती ८ धावा करून बाद झाली. कर्णधार स्नेह राणा हिने २० धावा केल्या. सुषमा वर्मा हिने १७ धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

ठराविक अंतरावर विकेट्स पडत गेल्याने गुजरातचा डाव अखेर ९ बाद १०७ धावांवर संपुष्टात आली. मुंबईकडून हेली मॅथ्यूज आणि नॅट सिव्हर ब्रंट यांनी सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ब्रंटने ४ षटके गोलंदाजी करताना २१ धावा खर्च करत ३ विकेट्स नावावर केल्या. तसेच, मॅथ्यूजने ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. तर अमेलिया केरने २ विकेट्स आणि इस्सी वोंगने १ विकेट घेत त्यांना साथ दिली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबई इंडियन्स संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने ३० चेंडूंचा सामना करताना ५१ धावा कुटल्या. या खेळीला तिने २ षटकार आणि ७ चौकारांचा साज चढवला. इनफॉर्म फलंदाज हेली मॅथ्यूजला डावाच्या पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ऍशले गार्डनरने बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. यानंतर नॅट सीवर ब्रंट आणि यास्तिका भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. नेट सीव्हर ३१ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा करून बाद झाली. तिच्याव्यतिरिक्त यास्तिका भाटिया हिने ४४ धावांचे योगदान दिले.

अमेलिया केर हिने १९ धावांचे योगदान दिले. त्यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना १०धावांचा आकडाही पार करता आला नाही. हुमैरा काझी (२) आणि अमनजोत कौर (०) यांना फार काही करता आले नाही. धारा गुजरने एक धाव आणि जिंतीमणी कलिता याने दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिले. यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना ऍशले गार्डनर हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने यावेळी ४ षटके गोलंदाजी करताना ३४ धावा खर्च करत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त किम गार्थ, स्नेह राणा आणि तनुजा कंवर यांनी प्रत्येकी १ विकेट नावावर केली.