WPL 2023 Highlights, MI-W vs DC-W: महिला प्रीमियर लीगमधील (WPL) सातवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा आठ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर या स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने २ बाद १०९ धावा केल्या.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा संघ १८ षटकांत सर्वबाद १०५ धावांवर आटोपला. मुंबईने १५ षटकांत २ बाद १०९ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी या सामन्यात गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सायका इशाक, इस्सी वाँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. यानंतर यस्तिका भाटियाने फलंदाजीत सर्वाधिक ४१ धावा केल्या. हेली मॅथ्यूजने ३२ धावांचे योगदान दिले. नताली सीव्हर २३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ११ धावा करून नाबाद राहिली.
त्याआधी दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने २५ आणि राधा यादवने १० धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुंबईचा पुढील सामना १२ मार्चला यूपी वॉरियर्सशी होणार आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स संघ ११ मार्च रोजी गुजरात जायंट्सशी भिडणार आहे.
Mumbai Indians Women (MI-W) vs Delhi Capital Women (DC-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला हायलाइट्स
मुंबई संघाला विजयासाठी १०६ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले होते. ते पूर्ण करण्यात या संघाला विशेष अडचण आली नाही. या संघाने १५ षटकात २ बाद १०९ धावा करताना सामना ८ विकेटने जिंकला.
एलिस कॅप्सीने दिल्ली कॅपिटल्सला दुसरे यश मिळवून दिले. तिने हेली मॅथ्यूजला जेमिमाह रॉड्रिग्जकडे झेलबाद केले. जेमिमाने शानदार झेल घेतला. मॅथ्यूजने ३१ चेंडूत ३२ धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा चौकार मारले. मुंबईने १२ षटकांत २ बाद ७९ धावा केल्या आहेत.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1633868332364623872?s=20
हेली मॅथ्यूज बाद
मुंबई संघाची दुसरी विकेट हेली मॅथ्यूजच्या रूपाने पडली. जेमिमाने मॅथ्यूजचा झेल घेतला. तिने ३१ चेंडूत ३२धावा केल्या.
मुंबईला विजयासाठी ३१ धावांची गरज होती.
मुंबईने १० षटकात एका विकेटवर ७५ धावा केल्या आहेत. विजयासाठी आणखी ३१ धावा करायच्या आहेत. हेली मॅथ्यूज आणि ब्रंट सध्या क्रीजवर आहेत.
https://twitter.com/mipaltan/status/1633865578023641088?s=20
मुंबईची पहिली विकेट यस्तिका भाटिकाच्या रूपात गमवावी लागली ज्याने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या आणि तारा नॉरिसच्या चेंडूवर पायचीत झाली. मुंबईने ९ षटकात एक विकेट गमावत ६५ धावा केल्या आहेत.
https://twitter.com/mipaltan/status/1633864728874450944?s=20
मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
या धावांचा पाठलाग करताना मुंबईने ८ षटकानंतर बिनबाद ६१ धावा केल्या आहेत.
यस्तिका ४०(२९)*
हेली १९(१९)*
विजयासाठी मुंबईला ७२ चेंडूत ४५ धावांची गरज आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1633860611539861504?s=20
पावरप्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद ४७
मुंबई संघाने ६ षटक संपल्यानंतर एकही बिनबाद ४७ धावा केल्या आहेत. यास्तिका २८ तर हिली १७ धावांवर नाबाद आहे.
मुंबईची सलामीवीर हेली मॅथ्यूजने दुसऱ्या डावातील चौथ्या षटकात शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन चौकार मारले. त्यामुळे मुंबईने चार षटकांत बिनबाद २९ धावा केल्या.
४ षटकानंतर धावसंख्या बिनबाद १७
यस्तिका १०(१०)*
हेली १७(१२)*
मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
या धावांचा पाठलाग करताना मुंबईने दोन षटकानंतर बिनबाद १५ धावा केल्या आहेत.
यस्तिका ९(५)*
हेली ५(५)*
दिल्लीचा संघ १८ षटकांत सर्वबाद १०५ धावांवर आटोपला. मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी यस्तिका आणि हेली मैदानात उतरल्या आहेत.
महिला प्रीमियर लीगच्या (WPL) सातव्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान आहे. हा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा संघ १८ षटकांत सर्वबाद १०५ धावांवर आटोपला. मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
https://twitter.com/wplt20/status/1633852294826545153?s=20
प्रथम फलंदाजी कराण दिल्ली कॅपिटल्सचा संघ १८ षटकांत १०५ धावांत गारद झाला. मुंबईला सलग तिसऱ्या विजयासाठी १०६ धावा करायच्या आहेत. सायका इशाक आणि इस्सी वाँगने त्यांच्यासाठी शानदार गोलंदाजी केली. दोघींनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मुंबईकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने २५ आणि राधा यादवने १० धावांचे योगदान दिले. या तिघीव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
दिल्लीचा संघ १८ षटकांत सर्वबाद १०५ धावांवर आटोपला. मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
दिल्ली कॅपिटल्सला नववा झटका बसला आहे. १७व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राधा यादवने इस्सी वँगच्या चेंडूवर हुमैरा काझीकडे झेल दिला. राधाने नऊ चेंडूत 10 धावा केल्या. वँगला तिसरे यश मिळाले.
https://twitter.com/mipaltan/status/1633850842846572552?s=20
१५ षटकांत दिल्लीचा स्कोअर ८९/ ७
https://twitter.com/wplt20/status/1633836850963157000?s=20
दिल्लीच्या डावातील १५ षटकांचा खेळ संपला असून या संघाने ७ गडी गमावून ८९ धावा केल्या आहेत. तानिया भाटिया आणि राधा यादव सध्या क्रीजवर आहेत.
सायका इशाकने दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगचा डाव संपवला. लॅनिंगने ४१ चेंडूत ४३ धावा केल्या. यादरम्यान तिने पाच चौकार मारले. यानंतर पुढच्याच षटकात दिल्लीला सहावा धक्का बसला. हिली मॅथ्यूजने १४व्या षटकातील पहिल्या चेंडूवर जेस जोनासेनला बाद केले. जोनासेनने तीन चेंडूत दोन धावा केल्या. अमनजोत कौरने तिचा झेल घेतला. त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर तानिया भाटिया यष्टीचीत झाली. तिला यास्तिका भाटियाने मॅथ्यूजच्या चेंडूवर यष्टीचीत केले. तानियाला तीन चेंडूंवर खातेही उघडता आले नाही.
या सामन्यात दिल्लीचे फलंदाज मारिजन कॅप आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी चांगली फलंदाजी केली नाही. चार चेंडूत दोन धावा करून मारिजन कॅपला इस्सी वोंगने क्लीन बोल्ड केले. तिच्या पाठोपाठ फलंदाजीला आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने निश्चितच काही धावा केल्या. तिने दिल्लीचा डाव पुन्हा रुळावर आणला. जेमिमाने १८ चेंडूत २५ धावा केल्या. यादरम्यान तिने तीन चौकार लगावले.
जेमिमा २५ धावांवर बाद, दिल्लीची चौथी विकेट पडली
जेमिमा चांगली फलंदाजी करत होती. तिने १८ चेंडूत २५ धावा केल्या होत्या, परंतु सायका इसाकने क्लीन बोल्ड केले. अशाप्रकारे दिल्ली संघाने आपली चौथी विकेट गमावली.
दिल्लीच्या डावाची १० षटके संपली आहेत. यादरम्यान या संघाने ३विकेट गमावल्या आहेत. दिल्ली संघाने आतापर्यत ५८धावा केल्या आहेत.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1633842920917958656?s=20
जेमिमाने तीन चौकार मारले
जेमिमाने ८व्या षटकात तीन चौकार मारले आणि या षटकात एकूण १३ धावा झाल्या. दिल्लीने ८ षटकांत ३ गडी गमावून ४५ धावा केल्या आहेत. जेमिमा ६ चेंडूत १४ धावा करून नाबाद आहे.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1633838087137816576?s=20
दिल्ली कॅपिटल्सच्या डावाचा पॉवरप्ले संपला आहे. त्याने सहा षटकांत दोन गडी बाद २९ धावा केल्या आहेत. कर्णधार मेग लॅनिंग १६ आणि मारिजन कॅप एक धाव घेतल्यानंतर क्रीझवर आहेत. सहाव्या षटकात दिल्लीला दुसरा धक्का बसला. पूजा वस्त्राकरने अॅलिस कॅप्सीला बाद केले. सात चेंडूत सहा धावा करून कॅप्सीने कलिताला झेलबाद केले.
https://twitter.com/mipaltan/status/1633837887161786372?s=20
अॅलिस कॅप्सीला ६ धावांवर बाद करत पूजाने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. २४ धावांच्या स्कोअरवर दिल्लीची दुसरी विकेट गेली. मारिजाने कॅप क्रीजवर आली आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1633835790982877184?s=20
सायका इशाकने मुंबई इंडियन्सला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने शफाली वर्माला क्लीन बोल्ड केले. शेफालीने सहा चेंडूत दोन धावा केल्या. दिल्लीने दोन षटकांत एका विकेटवर आठ धावा केल्या आहेत. शेफाली बाद झाल्यानंतर एलिस कॅप्सी क्रीजवर आली.
दोन षटकानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाची धावसंख्या १ बाद ८
मेग लॅनिंग ६
शफाली वर्मा २ धावा करुन बाद
मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा या दोन फलंदाजांनी दिल्लीच्या डावाला सुरुवात केली आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने संघात एक बदल केला. अरुंधती रेड्डीच्या जागी मिन्नू मणीचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने एकही बदल केला नाही.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1633826127402921984?s=20
मिन्नू मणी ही केरळची पहिली खेळाडू ठरली आहे.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1633825291129995264?s=20
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
https://twitter.com/mipaltan/status/1633825141292675076?s=20
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मिन्नू मणी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस
https://twitter.com/DelhiCapitals/status/1633825003497201665?s=20
दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने २ बाद १०९ धावा केल्या. त्याचबरोबर आठ विकेट्स दिल्लीचा धुव्वा उडवला. तसेच स्पर्धेतील आपला सलग तिसरा विजय नोंदवला