WPL 2023 Highlights, MI-W vs GG-W: मुंबई इंडियन्स महिला संघ महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेत जबरदस्त फॉर्मममध्ये आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात एकदाही पराभवाचे तोंड पाहिले नाहीये. अशात मंगळवारी (दि. १४ मार्च) डब्ल्यूपीएल स्पर्धेतील १२वा सामना मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला संघात पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईने गुजरातला ५५ धावांनी पराभूत केले. या विजयासह मुंबई स्पर्धेतील सलग पाच सामने जिंकणारा पहिला संघ बनला. विशेष म्हणजे, मुंबईने प्ले-ऑफसाठी क्वालिफायदेखील केले आहे. या विजयात कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासोबतच फलंदाज आणि गोलंदाजांनीही मोलाचा वाटा उचलला.

मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्ससमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ८ गडी गमावून १६२ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ५१ धावांची धडाकेबाज खेळी केली. तिथे यास्तिका भाटियाने ४४ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. इनफॉर्म फलंदाज हेली मॅथ्यूजला डावाच्या पहिल्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ऍशले गार्डनरने बाद केले. तिला खातेही उघडता आले नाही. यानंतर नॅट सीवर ब्रंट आणि यास्तिका भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. नेट सीव्हर ३१ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा करून बाद झाली.

यास्तिका भाटियाचे अर्धशतक हुकले आणि ३७ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्यानंतर ती धावबाद झाली. यानंतर हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांनी चौथ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. अमेलिया १९ धावा करून बाद झाली. त्याचवेळी इसाई वँगला खातेही उघडता आले नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरने झंझावाती अर्धशतक ठोकले, पण अर्धशतकानंतर तिने तिची विकेट गमावली. हरमनप्रीतला गार्डनरने हरलीन देओलच्या हाती झेलबाद केले.

हरमनप्रीतने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. हुमैरा काझी (२) आणि अमनजोत कौर (०) यांना फार काही करता आले नाही. धारा गुजरने एक धाव आणि जिंतीमणी कलिता याने दोन धावा केल्यानंतर नाबाद राहिले. गुजराततर्फे अ‍ॅश्ले गार्डनरने तीन बळी घेतले. तर किम गर्थ, स्नेह राणा आणि तनुजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

महिला प्रीमियर लीग २०२३चा १२वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्पर्धेत मुंबई आतापर्यंत अपराजित राहिली आहे. ते चार सामन्यांतून ४ विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत, तर गुजरात जायंट्सने आतापर्यंत ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.

Live Updates

Mumbai Indians Women (MI-W) vs Gujarat Giants Women (GG-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला हायलाइट्स

23:04 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: मुंबईचा सलग पाचवा विजय

मुंबईने गुजरातवर ५५ धावांनी मात करत सलग पाचवा विजय नोंदवला.

गुजरात जायंट्स १०७-९

https://twitter.com/wplt20/status/1635693537353428993?s=20

22:56 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: हेली मॅथ्यूजची तिसरी विकेट, तनुजा बाद

गुजरातने नववी विकेट गमावली असून तनुजा कंवर भोपळाही न फोडता माघारी परतली. हेली मॅथ्यूजची ही तिसरी विकेट होती.

गुजरात जायंट्स ९६-९

22:49 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: गुजरातला आठवा धक्का, किम गार्थ बाद

गुजरातला आठवा धक्का बसला असून किम गार्थ ८ चेंडूत ८ धावा करून बाद झाली. तिला नॅट सिव्हर ब्रंटने हरमनप्रीतकरवी झेलबाद केले.

गुजरात जायंट्स ९५-८

22:44 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: गुजरातला सातवा धक्का,कर्णधार स्नेह राणा बाद

गुजरातला सातवा धक्का बसला असून, कर्णधार स्नेह राणा १९ चेंडूत २० धावा करून बाद झाली. तिला नॅट सिव्हर ब्रंटने पायचीत केले.

गुजरात जायंट्स ८५-७

22:25 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: गुजरातला सहावा धक्का, हेमलता बाद

गुजरातला सहावा धक्का बसला असून हेमलता ६ चेंडूत ६ धावा करून बाद झाली. अमेलिया केरने तिला इस्सी वोंगकरवी झेलबाद केले.

गुजरात जायंट्स ५७-६

22:17 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: गुजरातची एकापाठोपाठ पडल्या विकेट्स, हरलीन देओल, ऍशले गार्डनर बाद

मुंबईच्या धारदार गोलंदाजीसमोर गुजरातचा तंबूत परतला आहे. हरलीन देओल, ऍशले गार्डनर एकापाठोपाठ बाद झाल्या. हरलीनने २३ चेंडूत २२ धावा केल्या तिला इस्सी वोंगने पायचीत केले. तर गार्डनर मोठा फटका मारण्याच्या नादात १० चेंडूत ८ धावा करून बाद झाली. तिला अमेलिया केरने बाद केले.

गुजरात जायंट्स ४९-५

https://twitter.com/wplt20/status/1635683861391892480?s=20

21:59 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: एकाच षटकात हेली मॅथ्यूजने घेतल्या २ विकेट्स

एकाच षटकात हेली मॅथ्यूजने २ विकेट्स घेऊन गुजरातला बॅंकफुटवर ढकलले.अ‍ॅनाबेल सदरलँड भोपळाही न फोडता तंबूत परतली. तिला मॅथ्यूजने पायचीत बाद केले.

गुजरात जायंट्स ३४-३

https://twitter.com/wplt20/status/1635679804174524417?s=20

21:54 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: गुजरातला दुसरा धक्का, पॉवर प्ले खराब सुरुवात

मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या १६३ धावांचा पाठलाग करताना पॉवर प्ले मध्ये २ विकेट्स पडल्या आहेत. सब्भिनेनी मेघना १७ चेंडूत १६ धावा करून बाद झाली. हेली मॅथ्यूजने अमेलिया केरकरवी तिला झेलबाद केले.

गुजरात जायंट्स ३४-२

21:30 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरातची खराब सुरुवात, सोफिया डंकली बाद

मुंबई इंडियन्सच्या १६३ धावांचा पाठलाग करताना गुजरातची खराब सुरुवात झाली आहे. सोफिया डंकली भोपळाही न फोडता बाद झाली.

गुजरात जायंट्स ०-१

https://twitter.com/wplt20/status/1635672391954354177?s=20

21:12 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: अर्धशतक करून हरमनप्रीत कौर बाद, गुजरातसमोर १६३ धावांचे आव्हान

अर्धशतक करून हरमनप्रीत कौर बाद झाली. तत्पूर्वी, चौकार मारत हरमनप्रीत कौरने अर्धशतक पूर्ण केले. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात ती बाद झाली. गार्डनर च्या गोलंदाजीवर हरलीनने अप्रतिम झेल घेतला. हरमनप्रीतने ३० चेंडूत ५१ धावा केल्या. अगदी पुढच्याच चेंडूवर अमनजोत भोपळाही न फोडता माघारी परतली. अखेर १६२ धावांवर मुंबईचा डाव संपुष्टात आला. गुजरातला विजयासाठी १६३ धावांची गरज आहे.

मुंबई इंडियन्स १६२-८

https://twitter.com/wplt20/status/1635670744318496768?s=20

21:02 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: मुंबईला सहावा धक्का, हुमैरा काझी बाद

एका बाजूने हरमनप्रीत तुफानी खेळी करत असताना दुसऱ्या बाजूने मात्र विकेट्स पडत आहेत. हुमैरा काझी केवळ २ धावा करून धावबाद झाली.

मुंबई इंडियन्स १४५-६

20:55 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: मुंबईला एकापाठोपाठ दोन धक्के, गुजरातची भेदक गोलंदाजी

हरमनप्रीत कौर-अमेलिया केर यांच्यातील अर्धशतकी भागीदारीनंतर तनुजा कंवरने ती जोडी फोडली. अमेलिया केर १३ चेंडूत १९ धावा करत बाद झाली. त्यानंतर आलेली इस्सी वोंग भोपळाही न फोडता माघारी परतली. स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल घेत तिला बाद केले.

मुंबई इंडियन्स १३६-५

20:27 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: यास्तिका भाटियाचा गगनचुंबी षटकार, मात्र अर्धशतक हुकले

मुंबईची सलामीवीर यास्तिका भाटियाने शानदार षटकार मारला. चाहत्यांनी देखील याचे कौतुक केले आहे. हरमनने केलेला कॉल न समजल्याने एकटीच धावत गेली आणि धावबाद झाली. तिने ३७ चेंडूत ४४ धावा केल्या, मात्र तिचे अर्धशतक हुकले.

मुंबई इंडियन्स ८४-३

https://twitter.com/wplt20/status/1635654433471340544?s=20

20:21 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का, नॅट सिव्हर ब्रंट बाद

स्वीप शॉट मारण्याच्या नादात नॅट सिव्हर ब्रंट पायचीत बाद झाली. तिला किम गर्थने बाद केले. ब्रंटने ३१ चेंडूत ३६ धावा केल्या.

मुंबई इंडियन्स ७५-२

https://twitter.com/wplt20/status/1635655892661317632?s=20

20:13 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: नॅट सिव्हर ब्रंट-यास्तिका भाटिया यांच्यात अर्धशतकी भागीदारी

नॅट सिव्हर ब्रंट-यास्तिका भाटिया यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. पहिल्याच षटकात हेली मॅथ्यूजची विकेट गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने दमदार पुनरागमन केले आहे. यास्तिका भाटिया आणि नॅट सीव्हर ब्रंट यांनी दहा षटकांत मुंबईला ६४ धावांपर्यंत नेले. ब्रंट स्नेह राणाच्या षटकात DRS घेतल्याने पायचीत होताना जीवदान मिळाले. डावाच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हेली मॅथ्यूज बाद झाला. त्यानंतर यास्तिका आणि सीवर यांनी एकही विकेट पडू दिली नाही.

मुंबई इंडियन्स ६४-१

https://twitter.com/wplt20/status/1635652050611736576?s=20

19:54 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: पहिल्या पॉवर प्ले मध्ये मुंबई इंडियन्सची चांगली सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले मध्ये मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली आहे. यास्तिका भाटिया आणि नॅट सिव्हर ब्रंट या दोघींनी डाव सावरत फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, पहिल्याच षटकात मुंबईला मोठा धक्का बसला होता. ऑफस्पिनर ऍशले गार्डनरने फॉर्मात असलेली फलंदाज हेली मॅथ्यूजला सोफिया डंकलेकरवी झेलबाद केले. एका षटकानंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर एक धाव आहे.

मुंबई इंडियन्स ४०-१

19:36 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, हेली मॅथ्यूज बाद

सामन्याला सुरुवात झाली असून अपराजित मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आहे. हेली मॅथ्यूज भोपळाही न फोडता तंबूत परतली आहे. ऍशले गार्डनरने सोफिया डंकलीकरवी तिला झेलबाद केले.

मुंबई इंडियन्स २-१

https://twitter.com/wplt20/status/1635643613995741184?s=20

19:11 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: दोन्ही संघांची प्लेईंग-११

गुजरातच्या कर्णधाराने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. एल वोल्वार्ड आणि जॉर्जिया वेअरहॅम यांना नकार दिला आहे. त्यांच्या जागी सोफिया डंकले आणि अ‍ॅनाबेल सदरलँड यांची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणताही बदल केलेला नाही.

https://twitter.com/wplt20/status/1635636391152320514?s=20

19:03 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सलग पाच नाणेफेक हरमनप्रीत कौरने हारले आहेत आणि सामने मात्र जिंकले आहेत. आजही तसेच होणार की वेगळे काही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1635635949152653312?s=20

19:01 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: स्नेह राणाच्या कॅप्टन्सीवर असणार चाहत्यांचे लक्ष

बेथ मूनी जेव्हापासून दुखापतग्रस्त झाली आहे तेव्हापासून स्नेह राणाने संघाची जबाबदारी तिने सांभाळली आहे. त्यामुळे तिच्या कॅप्टन्सीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1635630747955654657?s=20

18:50 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी गुजरातला विजय आवश्यक

मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी गुजरातला विजय आवश्यक आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चमकदार कामगिरी केली आहे. या संघाने लीगमध्ये आतापर्यंत सलग चार सामने जिंकले आहेत. तर गुजरात जायंट्सची कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. स्नेह राणाच्या संघाने चारपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे.

https://twitter.com/wplt20/status/1635619355114504192?s=20

18:36 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: मुंबई विरुद्ध गुजरात संभाव्य संघ काय आहेत?

मुंबई विरुद्ध गुजरात संभाव्य संघ काय आहेत?

मुंबई इंडियन्स महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रियांका बाला, यास्तिका भाटिया, नीलम बिश्त, हीदर ग्रॅहम, धारा गुजर, सायका इशाक, जिंतिमनी कलिता, अमनजोत कौर, हुमैरा काझी, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, नॅट सिव्हर ब्रंट, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, सोनम यादव.

गुजरात जायंट्स महिला संघ: स्नेह राणा (कर्णधार), अश्विनी कुमारी, हरलीन देओल, सोफिया डंकले, हर्ले गाला, ऍशले गार्डनर, किम गर्थ, दयालन हेमलता, मानसी जोशी, तनुजा कंवर, सब्भिनेनी मेघना, मोनिका पटेल, शबनम एमडी, पारुनिका सिसिया, सिडनी. अ‍ॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा, जॉर्जिया वेरेहम, लॉरा वोल्वार्ड.

18:20 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: महिला प्रीमिअर लीगला प्रोत्साहन देण्यासाठी काढली अनोखी शक्कल

महिला प्रीमिअर लीगला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखी शक्कल काढली आहे. wplच्या गाण्यावर वेगवगळ्या पद्धतीने डान्सचे व्हिडिओ टाकण्यासाठी चाहत्यांना आवाहन केले आहे. यावर त्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1635572748629217280?s=20

18:11 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: काय असेल रणनीती गुजरातची आज मुंबई विरोधात?

ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळते, त्यामुळे कर्णधार म्हणून फिरकीपटू किंवा अष्टपैलू खेळाडू निवडणे हा एक शहाणपणाचा निर्णय असेल. आजच्या सामन्यात सायका इशाक, ऍश गार्डनर किंवा हेली मॅथ्यूजवर बेट खेळता येईल. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यास नॅट सायव्हर ब्रंट आणि अमारिया केर हे देखील चांगले कर्णधार/उपकर्णधार निवडू शकतात.

18:05 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: कसे असेल आजचे पीच?

ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. येथील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत करते. नाणेफेक जिंकणारा संघ या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करू इच्छितो. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६५ धावांची आहे. फिरकीपटू खेळाचा आनंद घेऊ शकतात. येथे शेवटचा सामना यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला, जो मुंबई संघाने ८ गडी राखून जिंकला. या सामन्यात यूपीने एमआयला १६० धावांचे लक्ष्य दिले होते.

17:57 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: गुजरातच्या ह्या खेळाडूंकडून अपेक्षा

किम गर्थ गुजरात संघासाठी चांगले काम करत आहे. या सामन्यात संघाला आपल्या प्रमुख खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या सामन्यात, गुजरात जायंट्स असोसिएशन स्पर्धेतील सर्वात मोठ्या असोसिएशनच्या विरुद्ध आहे, त्यामुळे गुजरात असोसिएशनच्या सर्व खेळाडूंना विजयासाठी एकजुटीने काम करावे लागेल. किंवा नॉर्थ ईस्ट युनियन या दोन्ही संघांमध्‍ये एक सामना खेळला गेला ज्यात मुंबई इंडियन्स संघ विजेता ठरला होता.

17:52 (IST) 14 Mar 2023
MI-W vs GG-W: मुंबई इंडियन्सचा विजयी रथ गुजरात जायंट्स रोखणार का?

महिला प्रीमियर लीग २०२३चा १२वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्पर्धेत मुंबई आतापर्यंत अपराजित राहिली आहे. ते ४ सामन्यांतून ४ विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत, तर गुजरात जायंट्सने आतापर्यंत ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे आज गुजरात मागील सामन्यातील पराभवाचे उट्टे काढणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

https://twitter.com/wplt20/status/1635596691964407809?s=20

Mumbai Indians Women (MI-W) vs Gujarat Giants Women (GG-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला हायलाइट्स

ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईने गुजरातला ५५ धावांनी पराभूत केले. या विजयासह मुंबई स्पर्धेतील सलग पाच सामने जिंकणारा पहिला संघ बनला.