WPL 2023 MI-W vs RCB-W: महिला प्रीमियर लीगमधील चौथा सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेल. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने बंगळुरु ९ गडी राखून मोठा विजय नोंदवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने १४.२ षटकात १ बाद १५९ धावा करत विजय मिळवला. या स्पर्धेतील मुंबईचा सलग दुसरा विजय आहे.
मुंबईकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक नाबाद ७७ धावा केल्या. त्याचबरोबर नॅट सिव्हरने ५५ धावांची नाबाद खेळी केली. मुंबईचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईचे दोन सामन्यांनंतर चार गुण झाले आहेत, तर आरसीबीने सलग दुसरा सामना गमावला आहे.
या सामन्यात स्मृती मंधानाचा संघ १८.४ षटकांत सर्वबाद झाला आणि पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. आरसीबीचा संघ १५५ धावांवर आटोपला. या सामन्यात आरसीबी संघाकडून रिचा घोषने सर्वाधिक धावा केल्या. तिने २६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबई संघाकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
Mumbai Indians Women (MI-W) vs Royal Challengers Bangalore Women (RCB-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला हायलाइट्स
मुंबईने महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नऊ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने मुंबईसमोर 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने एक गडी गमावून लक्ष्य गाठले.
मॅथ्यूज आणि सिव्हर यांच्यात शतकी भागीदारी
मुंबईने १४ षटकानंतर १ बाद १५१ धावा केल्या आहेत.
आरसीबीचे गोलंदाज निष्प्रभ
हेली मॅथ्यूज आणि ब्रंट यांच्यासमोर आरसीबीचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहेत. आणि दोन्ही फलंदाज सहज धावा काढत आहेत. मुंबईने १२ षटकात एक बाद १२५ धावा केल्या आहेत.
हेली मॅथ्यूजने २६ चेंडूत झळकावले अर्धशतक
मुंबईच्या धावसंख्येने एका विकेटच्या नुकसानावर १०० धावा ओलांडल्या आहेत. हेली मॅथ्यूज आणि नॅट सिव्हर यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत आहेत. आता हा सामना जिंकणे मुंबईसाठी खूप सोपे आहे.
https://twitter.com/wplt20/status/1632785131093073920?s=20
हेली मॅथ्यूजने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तिने आतापर्यंतच्या खेळीत आठ चौकार आणि एक षटकार मारला आहे. तिने आपल्या तुफानी फलंदाजीने मुंबईला चांगल्या स्थितीत आणले असून हा संघ सलग दुसऱ्या सामन्यात मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे.
हिली मॅथ्यूज आणि नॅट सिव्हर यांनी मुंबईचा डाव सावरला आहे. दोघेही चांगल्या गतीने धावा काढत आहेत आणि समंजसपणे फलंदाजी करत आहेत. आठ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर ७६ अशी आहे. मॅथ्यूज ३८ आणि सिव्हर १५धावांवर खेळत आहे.
मुंबईने एक विकेट गमावून ५० धावा केल्या आहेत. हेली मॅथ्यूज आणि नॅट शिव्हर क्रीजवर आहेत. दोघींनाही मोठी भागीदारी करून मुंबईला लक्ष्याच्या जवळ घेऊन जायचे आहे. मुंबईसाठी १५६ धावांचे लक्ष्य फारसे अवघड असणार नाही. सहा षटकांनंतर मुंबईची धावसंख्या एका विकेटवर ५४ अशी आहे.
मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आहे. यस्तिका भाटिया २३ धावा काढून बाद झाली.
मुंबईने ५ षटकानंतर ४५ धावा केल्या आहेत.
मॅथ्यूज आणि यस्तिकाकडून मुंबईच्या डावाला सुरुवात झाली आहे. दोन षटकानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद १५
https://twitter.com/wplt20/status/1632770688242053121?s=20
महिला प्रीमियर लीगमधील चौथा सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स संघात होत आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथण फलंदाजी करताना मुंबईसमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.या सामन्यात स्मृती मंधानाचा संघ १८.४ षटकांत सर्वबाद झाला आणि पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. आरसीबीचा संघ १५५ धावांवर आटोपला.
https://twitter.com/wplt20/status/1632771832406319105?s=20
या सामन्यात आरसीबी संघकडून रिचा घोषने सर्वाधिक धावा केल्या. तिने २६ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. त्याचबरोबर मुंबई संघाकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
१८.४ षटकांत मंधानाचा संघ गारद झाला. अमेलिया केरने मेगन शुटला बाद करत आरसीबीचा डाव १५५ धावांत गुंडाळला. या सामन्यात स्मृती मंधानाचा संघ १८.४ षटकांत सर्वबाद झाला आणि पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही.
https://twitter.com/mipaltan/status/1632770841107656704?s=20
मेगन शुट १४ चेंडूत २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. अमेलिया केरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक यास्तिका भाटियाने तिला यष्टिचित केले. आता मुंबईसमोर विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य आहे.
आरसीबीची नववी विकेट 154 धावांवर पडली, रेणुका दोन धावा करून बाद झाली.
https://twitter.com/imfemalecricket/status/1632768904383610880?s=20
१४६ धावांच्या स्कोअरवर आरसीबीची आठवी विकेट पडली. श्रेयंका पाटील १५ चेंडूत २३ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत चार चौकार मारले. न रेणुका सिंग आता मेगन शुटसोबत क्रीजवर आहे.
https://twitter.com/thefield_in/status/1632768190567661569?s=20
१६ षटकानंतर आरसीबीची धावसंख्या ७ बाद १३२
आता मेगन शुट श्रेयंका पाटीलसोबत क्रीजवर आहे.
११२ धावांवर बेंगळुरूची सातवी विकेट पडली. रिचा घोष २६ चेंडूत २८धावा करून बाद झाली. हिली मॅथ्यूजने त्याला नॅट शिव्हरकरवी झेलबाद केले. आता मेगन शुट श्रेयंका पाटीलसोबत क्रीजवर आहे.
बंगळुरूची सहावी विकेट १०५धावांच्या स्कोअरवर पडली. कनिका आहुजा १३ चेंडूत २२ धावा करून बाद झाली. त्याने या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. पूजा वस्त्राकरने त्याला यस्तिका भाटियाकडे झेलबाद केले. आता श्रेयंका रिचा घोषसोबत क्रिजवर आहे. १३षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या ६ बाद ११० आहे.
आरसीबीला १०२ धावसंख्येवर बसला सहावा धक्का
कनिका आहुजा १३ चेंडूत २२ धावा करुन बाद झाली. तिला पुजाने झेलबाद केले.
१२ षटकानंतर ५ बाद १०२
आरसीबी संघाने १२ षटकानंतर ५ बाद १०२ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर कनिका आहुजा (२०) आणि रिचा घोष (२७) आहेत. या दोघींनी आतापर्यंत १० धावांची भागीरदारी केली आहे.
https://twitter.com/JioCinema/status/1632758338009313281?s=20
आरसीबी संघाने १० षटकानंतर ५ बाद ८१ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर कनिका आहुजा (२) आणि रिचा घोष (२५) आहेत. या दोघींनी आतापर्यंत १० धावांची भागीरदारी केली आहे.
बंगळुरूचा निम्मा संघ ७१ धावांवर तंबूत परतला आहे. पेरी १३ धावा करून धावबाद झाली. आरसीबी संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे.
https://twitter.com/imfemalecricket/status/1632753902851436544?s=20
आरसीबी संघाची धावसंख्या ७० पार
आरसीबी संघाने ८ षटकानंतर ४ बाद ७१ धावा केल्या आहेत. रिचा घोषन १९ आणि पॅरी १३ धावांवर खेळत आहेत.
https://twitter.com/JioCinema/status/1632753607996227585?s=20
रिचा आणि एलिस पॅरी क्रीजवर -
आरसीबीच्या आशा आता रिचा घोष आणि एलिस पेरी यांच्यावर आहेत. या संघाने ७ षटकात ४ गडी बाद ५७ धावा केल्या आहेत. आरसीबीने चांगली सुरुवात केली होती, परंतु मुंबईने चांगले पुनरागमन केले आणि हरमनप्रीत कौरचा संघ सध्या आरसीबीवर वर्चस्व गाजवू पाहत आहे. या षटकात १०धावा झाल्या.
https://twitter.com/Thameemthammi3/status/1632751926319394818?s=20
पावरप्लेच्या समाप्तीनंतर आरसीबीची धावसंख्या ४ बाद ४६
https://twitter.com/Bvekgupta/status/1632749854102544384?s=20
बंगळुरूची चौथी विकेट पडली
४३ धावांवर बेंगळुरूची चौथी विकेट पडली. कर्णधार स्मृती मानधना १७ चेंडूत २३धावा करून बाद झाली. हिली मॅथ्यूजने त्याला ईशा वाँगकरवी झेलबाद केले. मंधानाने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. एका टप्प्यावर बेंगळुरूची बिनबाद ३९ धावा होती, मात्र चार धावांत तीन गडी गमावल्याने हा संघ अडचणीत सापडला आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1632749205340012547?s=20
आरसीबीला पहिला धक्का; सोफी सोफी डिव्हाईन झेलबाद
सोफी डिव्हाईन १६ धावा करुन बाद झाली. तिला सायकाने बाद केले
तीन षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या बिनबाद २२ धावा
स्मृती मंधाना ११(११)
सोफी डिव्हाईन ११(७)
स्मृती मंधाना आणि सोफी डिव्हाईनकडून आरसीबीच्या डावाला सुरुवात
पहिल्या षटकांत आरसीबीच्या बिनबाद ११ धावा
स्मृती मंधाना ५(५)
सोफी डिव्हाईन ६(१)
सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गाळला घाम
खेळपट्टीवर मोठी धावसंख्या अपेक्षित -
मुंबईच्या बेबॉर्न स्टेडियमच्या खेळपट्टीवर खूप धावा होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, येथे फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी आहे. जिथे गोलंदाजांना फारशी मदत मिळण्याची अपेक्षा नाही. अशा स्थितीत दोन्ही संघांकडून चुरशीने धावा केल्या जातील आणि सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधआर), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक
https://twitter.com/mipaltan/status/1632738168863588352?s=20
आरसीबीने एक बदल, मुंबई संघात कोणताही बदल नाही
https://twitter.com/wplt20/status/1632738079088754690?s=20
मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी आरसीबीने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे, तर मुंबईने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Mumbai Indians Women (MI-W) vs Royal Challengers Bangalore Women (RCB-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर महिला हायलाइट्स
बईने आरसीबीचा नऊ गडी राखून पराभव केला. 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाने 14.2 षटकात 159 धावा करत लक्ष्य गाठले.