Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women Highlights Updates: शनिवारी (दि. ४ मार्च) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीतची शानदार तुफानी अर्धशतकी खेळी आणि त्याला गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे गुजरातचा अक्षरशः धुव्वा उडवला.
यष्टीरक्षक यास्तिका भाटिया अवघ्या एका धावेवर बाद झाल्यानंतर हिली मॅथ्यूज आणि नेट सायव्हर यांनी मुंबईचा डाव सावरला. मात्र अर्धशतक करण्यापूर्वीच मॅथ्यूज ४७ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांच्यात तब्बल ८९ धावांची भक्कम भागीदारी झाली आणि तिथेच गुजरातची अवस्था बिकट झाली होती. हरमनप्रीतने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत महिला प्रीमिअर मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावले. तिने ३० चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी केली. तर अमेलियाने २४ चेंडूत ४५ धावांची खेळी करत तिला साथ दिली.
गुजरातकडून स्नेह राणा खूप महाग ठरली पण तिलाच सर्वाधिक २ विकेट्स घेता आल्या. तर ऐश गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेअरहॅम यांना प्रत्येकी १-१ विकेट्स घेण्यात यश मिळाले. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. मात्र त्यात जायंट्स अपयशी पडले. दवाचा किती परिणाम होतो याची सर्वांना उत्सुकता होती या सामन्यात फारसे तसे काही पहावयास मिळाले नाही.
Mumbai Indians Women (MI-W) vs Gujarat Giants Women (GG-W)
Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला हायलाइट्स
मुंबईच्या धारदार गोलंदाजीपुढे गुजरातचे लोटांगण, तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय
गुजरातला आठवा धक्का बसला असून मानसी जोशी अवघ्या ६ धावा करून पायचीत बाद झाली आहे. गुजरातच्या पराभवाची केवळ औपचारिकता उरली आहे.
गुजरात जायंट्स ४९-८
एकाच अमेलियाने गुजरातच्या दोन विकेट्स घेतल्या. तिने स्नेह राणाला पायचीत तर तनुजा कंवरला झेलबाद केले. राणाने केवळ एक धाव तर तनुजाला भोपळाही फोडता आला नाही. अवघ्या २३ धावांत गुजरातने ७ विकेट्स गमावल्या आहेत.
गुजरात जायंट्स २३-७
गुजरातचा निम्मा संघ तंबूत परतला असून जॉर्जिया वेअरहॅम केवळ ८ धावा करून बाद झाली, तिला सायका इशाकने त्रिफळाचीत केले. गुजरातला लवकरच काहीतरी करणे गरजेचे आहे.
गुजरात जायंट्स २२-५
गुजरातला चौथा धक्का बसला, एनाबेल सदरलँड अवघ्या ६ धावा करून बाद झाली. तिला सायका इशाकने त्रिफळाचीत केले.
गुजरात जायंट्स १२-४
गुजरातच्या एकापाठोपाठ तीन विकेट्स पडल्या असून अवस्था बिकट आहे. नेट सायव्हर-ब्रंट, सब्बिनेनी मेघनाला अवघ्या २ धावांवर त्रिफळाचीत केले. गुजरातला मोठ्या भागीदारीची गरज असून कर्णधार कधी खेळायला येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गुजरात जायंट्स ५-३
धावांचा पाठलाग करताना गुजरातची खराब सुरुवात झाली. हरलीन पाठोपाठ ऐश गार्डनरही भोपळाही न फोडता तंबूत परतली. तिला इस्सी वोंगने झेलबाद केले.
गुजरात जायंट्स ३-२
गुजरात जायंट्सला मोठा धक्का बसला असून कर्णधार बेथ मुनी दुखापतग्रस्त झाली. ती मैदानाबाहेर पडताच गुजरातला आणखी एक धक्का बसला हरलीन देओलला भोपळाही फोडता आला नाही. नेट सायव्हर-ब्रंटने तिला झेलबाद केले.
गुजरात जायंट्स १-१
मुंबईने ठेवलेल्या २०८ धावांचा पाठलाग करण्यासाठी गुजरातचे सलामीवीर मैदानात आले आहेत.
गुजरात जायंट्स १-०
शेवटच्या षटकात पूजा वस्त्राकर १५ धावा करून बाद झाली. मात्र, दोन षटकार मारत मुंबईने २०० धावांचा आकडा पार केला. त्यात अमेलिया केर २४ चेंडूत ४५ धावा करून नाबाद राहिली. मुंबईने पहिल्या सामन्यात गुजरातसमोर २०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
मुंबई इंडियन्स २०७-५
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला असून कर्णधार हरमनप्रीत कौर दमदार अर्धशतक करून बाद झाली. तिने ३० चेंडूत ६५ धावा केल्या. तिला स्नेह राणाने झेलबाद केले.
मुंबई इंडियन्स १६६-४
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या अर्धशतकाने मुंबई इंडियन्सची धावसंख्याही १५० धावांच्या पुढे गेली आहे.
मुंबई इंडियन्स १५९-३
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1632043570143313920?t=YjHdbMtdEdi8zwUCJ8ilaw&s=08
हरमन-अमेलियाची अर्धशतकी भागीदारी झाली असून मुंबईची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरु आहे. मोनिका पटेलच्या एकाच षटकात तब्बल २१ धावा कुटल्या आणि त्याच बरोबर हरमनप्रीतचे शानदार अर्धशतक देखील पूर्ण झाले.
मुंबई इंडियन्स १५०-३
फलंदाजीला येताच हरमनने केली चौकारांची आतिषबाजी केली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने वेअरहॅमच्या एकाच षटकात दोन चौकार मारत मुंबईच्या शंभर धावा पूर्ण केल्या.
मुंबई इंडियन्स १०३-३
मुंबई इंडियन्स मोठा धक्का बसला. मॅथ्यूजचे अर्धशतक हुकले ती ४७ धावा करून बाद झाली. तिला ऐश गार्डनरने त्रिफळाचीत केले.
मुंबई इंडियन्स ७७-३
मुंबई इंडियन्स दुसरा धक्का बसला असून नताली सीव्हर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाली. तिला जॉर्जिया वेअरहॅमने २३ धावांवर झेलबाद केले.
मुंबई इंडियन्स ६९-२
एनाबेल सदरलँडच्या एकाच षटकात हिली मॅथ्यूजने खणखणीत असे दोन षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. तिने पुढील षटकात देखील शानदार षटकार लगावत धावांची धावगती वाढवली आहे.
मुंबई इंडियन्स ६८-१
महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या सामन्यात पॉवर प्ले मध्ये मुंबईची चांगली सुरुवात झाली आहे. त्यांनी ४४ धावा करत केवळ १ विकेट गमावली आहे.
मुंबई इंडियन्स ४४-१
मुंबईला पहिला धक्का बसून तनुजा कंवरने यास्तिका भाटियाला अवघ्या १ धावेवर झेलबाद केले.
मुंबई इंडियन्स १७-१
मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर मैदानात आले असून सामन्याला सुरुवात होत आहे.
मुंबई इंडियन्स ०-०
कसे असतील मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स दोन्ही संघ?
https://twitter.com/wplt20/status/1632021855853858818?t=4OUeDC5fHYQsXu8g4YGBqA&s=08
बेथ मुनीच्या गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
पाचही संघांच्या कर्णधारांनी महिला प्रीमियर लीगच्या दिमाखदार ट्रॉफीचे अनावरण केले.
प्रसिद्ध पॉप गायक एपी ढिल्लोन यांनी आपल्या पंजाबी गाण्यांनी सर्वांना थक्क केले. 'दिल तेरा' आणि 'क्या बात है' गाऊन त्याने लोकांची मने जिंकली. याशिवाय त्याने अनेक गाणी गायली. स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी एपी ढिल्लोनच्या कामगिरीचा खूप आनंद घेतला.
सचिन तेंडुलकरने वुमन्स प्रीमियर लीगच्या लॉन्चिंगवर ट्विट केले. त्याने लिहिले, “लक्षात ठेवा की प्रत्येक चौकार हा पार्कच्या बाहेर षटकार मारला जाईल आणि प्रत्येक विकेट हा क्रिकेटमधील लैंगिक समानतेचा विजय असेल. त्यांची कथा बनवणार्या अतुलनीय महिलांचा जयजयकार करूया!''
https://twitter.com/sachin_rt/status/1632004603742138369?t=oSmE8TuGzTyZxkUYrkWwhA&s=08
क्रिती सेननने चकदे इंडिया या गाण्यावर तिच्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी 'बादल पे पाँव है'वर डान्स केला. त्यानंतर चकदे इंडियाच्या टायटल ट्रॅकवरही डान्स केला. त्यानंतर तिने 'लुका छुपी' चित्रपटातील 'कोका कोला तू' गाण्यावर डान्सही केला. त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध 'परम सुंदरी' गाण्यावर नृत्य करून लोकांची मने जिंकली.
https://twitter.com/Tushar032000/status/1632006965642801152?t=ia8TGz2nkoYX_WyciQuUEw&s=08
मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाच्या सूत्रधार प्रसिद्ध अँकर मंदिरा बेदी आहेत. कियारा अडवाणी प्रथम आली आहे. कियाराने तिच्या 'क्या बात है' गाण्याने परफॉर्मन्सची सुरुवात केली. तिने तिच्या 'भूल भुलैया 2' या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवरही डान्स केला.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील हा पहिला सामना मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना खूप आवडते. अशा परिस्थितीत तुम्हाला या मैदानावर १६०चा स्कोअर पाहायला मिळेल. मात्र, रात्री येथे दव पडू शकते. अशा स्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय हा येथे चांगला आणि समंजस निर्णय मानला जाईल.
महिला प्रीमियर लीगसाठी बीसीसीआयने उद्घाटन सोहळ्यापूर्वी अॅप लॉन्च केले. यावर WPL विषयी सर्व माहिती देण्यात येणार आहे.
“ही तर फक्त सुरुवात!” असे म्हणत BCCI सचिव जय शाह यांनी वुमेन्स प्रीमिअर लीग अँथम सॉंग रिलीज केले. WPL महिला क्रिकेट मध्ये एक मैलाचा दगड ठरेल अशी सर्वांना आशा आहे.
Mumbai Indians Women (MI-W) vs Gujarat Giants Women (GG-W)
Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला हायलाइट्स
मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.