RCB कर्णधार स्मृती मंधानाने सहकारी माजी पुरुष कर्णधार ज्यांचा जर्सी नंबर १८ आहे अशा विराट कोहलीशी केलेल्या तुलनेवर भाष्य केले आहे. मंधाना WPL २०२३ मध्ये आरसीबीचे नेतृत्व करेन. स्मृती मंधाना म्हणाली की, “तिला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) मधील विराट कोहलीशी तुलना केलेली आवडत नाही.” ती पुढे म्हणाली की, “विराट कोहलीने जे काही साध्य केले आहे त्याच्या जवळपास देखील नाही.” मंधाना आणि कोहली या दोघांचाही जर्सी क्रमांक १८ आहे. भारताकडून आणि RCBकडूनही जर्सी क्रमांक त्यांचा क्रमांक हा सारखाच आहे. गेल्या वर्षी कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडल्यानंतर, फ्रँचायझीला मंधानामध्ये १८ क्रमांकावर नवीन कर्णधार मिळाला आहे.
मी विराटच्या जवळपास देखील नाही- मंधाना
मंधाना पुढे म्हणाली, “मला अशी तुलना केलेली आवडत नाही कारण कोहलीने जे मिळवले ते खूप अद्वितीय आणि अदभूत आहे. मला ती पातळी गाठण्याची आशा आहे, पण मी त्याच्या तुलनेत कुठेच नाही. त्याने या फ्रँचायझीसाठी (RCB) जे काही केले आहे, ते मलाही करायला आवडेल आणि त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.”
मंधानाला कर्णधारपद नवीन नाही कारण तिने फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे आणि अलीकडच्या काळात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर बरोबर उपकर्णधार म्हणून टीम इंडियासाठी काम करत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने पुढे सांगितले की, “ती आरसीबीमधील आपला सर्व अनुभव पणाला लावून चषक जिंकण्यासाठी बेस्ट देणार आहे. मंधाना म्हणाली, “महिला प्रीमियर लीगमुळे मला वाटते की महिला क्रिकेटसाठी हा एक अद्भुत काळ आहे. भारतातील लोक महिला क्रिकेटला कसे प्रोत्साहन देतात तसेच कसे स्वीकारतात हे तुम्हाला त्यांच्या पाठिंब्यावरून सर्वत्र दिसत आहे.
पुढे बोलताना स्मृती म्हणाली, “मी वयाच्या १६व्या वर्षापासून देशांतर्गत संघांचे नेतृत्व करत आहे. मी महाराष्ट्र संघ आणि चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. कर्णधारपद ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही. मला WPL मध्ये त्या सर्व अनुभवी लोकांचा उपयोग करून घ्यायचा आहे. आरसीबी ५ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल.
दोन्ही खेळाडूंवर आरसीबी पूर्ण भरवसा
२००८ मध्ये मलेशियामध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीला आरसीबीने लगेचच करारबद्ध केले होते. विराट कोहली अद्याप वरिष्ठ स्तरावर भारतासाठी खेळला नसला तरी वयोगट स्तरावर त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आरसीबीला त्याच्याकडून खूप आशा होत्या. आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यातच आरसीबीने विराट कोहलीला प्लेइंग-११ मध्ये संधी दिली आणि तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
स्मृती मंधाना आधीच महिला क्रिकेटमधील सुपरस्टार आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. स्मृतीने भारतासाठी १९३ सामन्यांमध्ये भाग घेतला आहे ज्यात तिच्या नावावर ६००० हून अधिक धावा आहेत. जेव्हा भारतीय संघाला तिच्या फलंदाजीची सर्वाधिक गरज असते तेव्हा ती नक्कीच चांगली कामगिरी करते. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून विराट आरसीबीसाठी जबरदस्त खेळ दाखवत आहे. आता आरसीबीला महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मंधानाकडून मोठ्या आशा आहेत.