Royal Challengers Bangalore Women vs Gujarat Giants Women Match Updates: महिला प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजराज जायंट्सशी होत आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. आरसीबी आणि गुजरातला या स्पर्धेतील पहिला विजय मिळावा असे वाटत आहे. या दोघांना सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गुजरात जायंट्सने स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावले आहेत
महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यानंतर गुजरातला यूपी वॉरियर्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ३ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. आता गुजरात आज आरसीबीविरुद्ध भिडणार असून विजयासाठी जोर लावणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोण उघडणार विजयाचे खाते?
या सामन्यात कोणता संघ विजयाचा प्रमुख दावेदार आहे याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने गमावले आहेत. दुसरीकडे, संघाच्या दृष्टिकोनातून या सामन्यात आरसीबीचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे. गुजरात जायंट्सच्या तुलनेत आरसीबीची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग खूप मजबूत आहेत.
आरसीबी विजयाच्या इराद्याने उतरेल
या सामन्यात आरसीबी स्पर्धेतील पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा पहिला सामना ६० धावांनी हरला. यानंतर मुंबईविरुद्ध संघाला ९ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. स्मृती मानधना, अॅलिसा पेरी, हीदर नाइट यांसारख्या अनेक स्टार खेळाडू आरसीबीमध्ये आहेत. यानंतरही संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
गुजरात संघ प्रथम फलंदाजी करेल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातची नियमित कर्णधार बेथ मुनीही या सामन्यात खेळत नाही. पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना तिला दुखापत झाली होती. स्नेह राणा सलग दुसऱ्या सामन्यात कर्णधार आहे. यावेळी त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. आरसीबीने एक बदल केला आहे. दिशा कसाटच्या जागी पूनम खेमनारचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांची प्लेईंग ११
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), पूनम खेमनार, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, प्रीती बोस.
गुजरात जायंट्स: सबिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, अॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (विकेटकीपर), अॅशले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर.