WPL 2023 RCB vs GG Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीग (WPL) चा १६ वा सामना खेळला गेला. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि आरसीबी संघ आमने-सामने आले होते. आरसीबीने गुजरात जायंट्स ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. सोफी डिव्हाईनच्या धडाकेबाज खेळीमुळे आरसीबीने सलग दुसरा सामना जिंकला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी बाद १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १५.३ षटकांत २ बाद १८९ धावा केल्या. सोफी डिव्हाईनने ३६ चेंडूत ९९ धावांची स्फोटक खेळी खेळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरसीबी संघाने १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. सलामी फलंदाज स्मृती आणि सोफीने आक्रमक फलंदाजी करताना पहिल्या विकेट्साठी १२५ धावांची भागादारी केली. त्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना ३७ धावांवर बाद झाली. तिने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तिला स्नेह राणाने बाद केले. हीदर नाइटने १५ चेंडूत २२ आणि एलिस पेरीने १२ चेंडूत १९ धावा करून सामना संपवला. दोन्ही फलंदाज नाबाद राहिले.

सोफी डिव्हाईनचे शतक हुकले –

त्यानंतर आरसीबीच्या सोफी डिव्हाईनचे शतक हुकले. ती ९९ धावांवर बाद झाली. डिव्हाईनने ३६ चेंडूंच्या खेळीत ९ चौकार आणि ८ षटकार ठोकले. तिने २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. किम गर्थच्या गोलंदाजीवर अश्विनी कुमारीने तिला झेलबाद केले. सोफीला तिच्या या दमदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

गुजरातचा डाव –

गुजरातकडून लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक ६८ धावा केल्या. तिने ४२ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. ऍशले गार्डनरने २६चेंडूत ४१ आणि सबिनेनी मेघनाने ३२ चेंडूत ३१धावा केल्या. सोफिया डंकले १० चेंडूत १६ धावा करून बाद झाली. शेवटच्या षटकात हरलीन देओल आणि दयालन हेमलता यांनी तुफानी फलंदाजी केली. दोघींनी मिळून नऊ चेंडूत २७ धावांची भागीदारी केली. हेमलताने सहा चेंडूंत १६ धावा करून नाबाद राहिल्या आणि हरलीन देओलने पाच चेंडूंत १२ धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने दोन बळी घेतले. सोफी डिव्हाईन आणि प्रीती बोस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.