WPL 2023 Auction: महिला प्रीमियर लीगसाठी सोमवारी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात एका खेळाडूचा समावेश केला आहे जो दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करू शकतो. ही खेळाडू दुसरी कोणी नसून टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. हरमनप्रीत कौरला मुंबई संघाने १.८० कोटी रुपयांना खरेदी केले. ५० लाखांच्या मूळ किंमतीसह त्याने लिलावात प्रवेश केला. त्याच्यासाठी मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात त्रि-पक्षीय बोली लावण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

MI संघात भारतीय क्रिकेट संघाच्या महिला आणि पुरुष दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. हरमनप्रीत आणि रोहित शर्मा दोघेही मुंबई संघाचा भाग आहेत. मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघाचा कर्णधार रोहित शर्माने ट्विटरवर यशस्वी लिलावाबद्दल त्याच्या फ्रँचायझीचे अभिनंदन केले. रोहित ट्विट करत म्हणतो की,  “एक कुटुंब आता मोठे आणि मजबूत झाले आहे! यशस्वी लिलावाबद्दल @mipaltan चे अभिनंदन. आमच्या महिला संघाला ब्लू आणि गोल्डमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहोत.”

काय म्हणाली हरमनप्रीत?

मुंबई इंडियन्सने खरेदी केल्यानंतर काही वेळातच हरमनप्रीत कौरने सांगितले की तिला रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघात खेळायला आवडेल. ती म्हणाली, “मी नेहमीच मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना पाहिले आहे आणि आता मला मुंबई इंडियन्स संघाचा भाग होण्याची संधी आहे. मला आशा आहे की आम्ही एक चांगली टीम बनवू. आपल्या सर्वांसाठी ही एक मोठी संधी आहे जी आपण अनुभवणार आहोत.”

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: कोण म्हणतं की कसोटी क्रिकेट संपल, दिल्लीतील सामन्याची सगळी तिकिटे सोल्ड आउट; चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह

महिला प्रीमियर लीग आणि लिलावाच्या अनुभवाबद्दल बोलताना हमरनप्रीत म्हणाली, “हे आमच्यासाठी गेम चेंजर असेल. आम्ही पहिल्यांदाच हे दडपण अनुभवणार आहोत, त्यामुळे मी यासाठी खूप उत्साहित आहे. यामुळे महिला क्रिकेट पूर्णपणे बदलेल. केवळ भारतातच नाही तर जगभरात. ही एक चांगली सुरुवात आहे. आम्ही सर्वजण लवकरच मुंबईत येत आहोत. मला आशा आहे की आम्हाला मुंबईत खूप प्रेम मिळेल. मुंबई इंडियन्सचे चाहते नेहमीच खूप छान असतात. आता आम्ही देखील मुंबईसाठी परफॉर्म करू. पुरुषांच्या संघाप्रमाणेच भारतीय महिला संघ देखील उत्तम कामगिरी करेन.”

हरमनप्रीत कौरचा शानदार रेकॉर्ड

हरमनप्रीत कौर सध्या दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी२० विश्वचषकात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहे. हरमनप्रीत कौरच्या टी२० कारकिर्दीवर नजर टाकली तर तिने १४७ सामन्यात २८.१५ च्या सरासरीने २८५६ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याच्या नावावर टी२० इंटरनॅशनलमध्ये एक शतक आणि ९ अर्धशतके आहेत.