RCB beat Mumbai by 5 runs : महिला प्रीमियर लीग २०२४ च्या एलिमिनेटरमध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चमकदार कामगिरी रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव केला. एके काळी या सामन्यात मुंबई इंडियन्स सहज जिंकेल असे वाटत होते, पण आरसीबीच्या गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी करताना बाजी पलटली आणि फायनलमध्ये धडक मारली. सामना जिंकल्यानंतर स्मृती मंधानाने तिच्या सहकाऱ्यांना मिठी मारली आणि भावूक झाली. यानंतर स्मृती मंधानाने सामन्यात कोणती विकेट टर्निंग पॉइंट ठरली, याबद्दल सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, एका क्षणी मुंबई इंडियन्स सात विकेट्स शिल्लक असताना अगदी आरामात जिंकेल अशी दिसत होती. त्यावेळी हरमनप्रीतला साथ देण्यासाठी अमेलिया केरने क्रीजवर उपस्थित होती, जिने जॉर्जिया वेअरहॅमविरुद्ध दोन चौकार मारल्यानंतर लय शोधली होती. यानंतर एमआयच्या कर्णधाराने एलिस पेरीविरुद्ध दोन चौकार मारले, ज्यामुळे मुंबईला शेवटच्या तीन षटकात केवळ २० धावा करायच्या होत्या. मात्र, १८व्या षटकात श्रेयंका पाटीलने हरमनप्रीतला बाद केले आणि बाजी पलटली.

स्मृती मंधानाने सांगितला सामन्यातील ‘टर्निंग पॉइंट’ –

सामन्यानंतर आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली, “काय खेळ आहे, ही भावना अजूनही कमी झालेली नाही. अर्ध्या टप्प्यावर आम्हाला वाटले की आम्ही २० धावांनी मागे आहोत. पण आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले ते आश्चर्यकारक होते. संघाची धावसंख्या १३५ असताना जिथे तुम्हाला आक्रमण करायचे की बचाव करायचे याची खात्री नसते, पण आशाचे शेवटचे षटक अवास्तव होते.” स्मृतीला सामन्यातील टर्निंग पॉइंटबद्दल विचारले असता ती म्हणाली, “नक्कीच हरमनची विकेट आहे. श्रेयंकाचे ते षटक आणि अगदी सोफीचे १९ वे षटक, कारण सजना देखील चांगली हिटर आहे, त्या १९व्या षटकाने खूप फरक निर्माण केला.”

हेही वाचा – WPL 2024: बंगळुरूची अंतिम फेरीत धडक, मुंबईचा ५ धावांनी पराभव करत रचला इतिहास

सामन्याबद्दल बोलायचे तर, १३६ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूज या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. हेली मॅथ्यूज १५ धावा करून बाद झाली. त्यानंतर सातव्या षटकात पेरीने यास्तिका भाटियाला १९ धावांवर बाद केले. नेट स्कायव्हर-ब्रेंट २३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ धावांची उपयुक्त खेळी खेळली. विजयाच्या जवळ, संजीवन सजना एक धाव काढून बाद झाली, तर पूजा वस्त्राकर चार धावा करून बाद झाली. अमेलिया केर २७ धावांवर नाबाद राहिली आणि अमनजोत कौर एका धावेवर नाबाद राहिली. मुंबई इंडियन्सला निर्धारित २० षटकांत सहा गडी गमावून केवळ १३० धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना अखेरच्या षटकांत पाच धावांनी पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा – चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पुन्हा ‘संमिश्र प्रारुपा’चा पर्याय

त्तत्पूर्वी स्मृती मंधाना आरसीबीसाठी विशेष काही करू शकली नाही. ती १० धावा करून बाद झाली. आऊट झाल्यानंतर स्मृती खूप निराश झाली होती. पण आरसीबीच्या विजयानंतर ती खूपच वेगळी दिसत होती. विजयानंतर स्मृतींनी श्रेयंका पाटीलला मिठी मारली आणि भावूक झाली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpl 2024 after win against mi rcb captain smriti mandhana said harmanpreet kaur wicket was turning point in match vbm